Homeशैक्षणिक - उद्योग जिओ पेमेंट्स बँकचा ‘सेव्हिंग्ज प्रो’ लाँच

जिओ पेमेंट्स बँकचा ‘सेव्हिंग्ज प्रो’ लाँच

• ग्राहकांना मिळणार अधिक परतावा
कोल्हापूर :
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या सहाय्यक कंपनी जिओ पेमेंट्स बँक लिमिटेडने ‘सेव्हिंग्ज प्रो’ ही नवीन सेवा सुरू केली आहे.
या सेवेद्वारे ग्राहकांच्या बचतीचा किंवा अतिरिक्त रकमेचा स्वयंचलित पद्धतीने ओव्हरनाईट म्युच्युअल फंडांच्या ‘ग्रोथ प्लॅन’मध्ये गुंतवणूक केली जाईल. त्यामुळे ग्राहकांना निष्क्रिय पडलेल्या पैशावर जास्त कमाईची संधी मिळणार आहे. ही गुंतवणूक प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असून ‘जिओ फायनान्स ॲप’द्वारे पार पडेल.
फक्त काही क्लिकमध्ये जिओ पेमेंट्स बँकेचे खातेदार आपले खाते ‘सेव्हिंग्ज प्रो’मध्ये अपग्रेड करू शकतात. अपग्रेडनंतर ग्राहक आपल्या खात्यातील ठराविक रकमेची मर्यादा निश्चित करू शकतील, जी सुरुवातीला किमान ₹५,००० पासून सुरू होईल. या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम स्वयंचलितरीत्या कमी जोखमीच्या निवडक ओव्हरनाईट म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवली जाईल.
या सुविधेमुळे ग्राहक दररोज ₹१,५०,००० पर्यंतची गुंतवणूक करू शकतील. रिडेम्प्शनची प्रक्रिया सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केली जाईल. ग्राहकांना आपल्या गुंतवणुकीपैकी ९०% रक्कम तत्काळ रिडीम करण्याची सोय असेल, ज्याची जास्तीत जास्त मर्यादा ₹५०,००० आहे. उर्वरित रक्कम १ ते २ कामकाजाच्या दिवसांत रिडीम करता येईल.
महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांचा पैशावर पूर्ण ताबा राहील. येथे कोणतेही एंट्री किंवा एग्झिट लोड, लपलेले शुल्क किंवा लॉक-इन कालावधी नसणार आहे. ग्राहक स्वतः योग्य म्युच्युअल फंड निवडू शकतील, मर्यादा निश्चित अथवा बदलू शकतील आणि गुंतवणुकीवरील परतावा पारदर्शकतेने पाहू शकतील.
लाँचच्याप्रसंगी जिओ पेमेंट्स बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद ईश्वरन म्हणाले की, कमी व्याजदराच्या वातावरणात आर्थिकदृष्ट्या जागरूक ग्राहक आपल्या बचतीत वाढ करण्यासाठी उत्तम पर्याय शोधत आहेत. सेव्हिंग्ज प्रो ही सेवा त्यांना निष्क्रिय बँक बॅलन्सला उत्पन्नाच्या संधीमध्ये बदलण्याची संधी देईल. कोणतीही कागदपत्रे नाहीत, कोणताही खर्च नाही आणि सहज उपलब्धता – अशा सोप्या मार्गाने आम्ही भारतीयांच्या धनव्यवस्थापनाच्या अपेक्षांना अनुरूप भविष्यकालीन उत्पादन सादर करत आहोत.
कंपनीने आपल्या निवेदनात सांगितले की, जिओ पेमेंट्स बँकचे ‘सेव्हिंग्ज प्रो’ हे आर्थिक निर्णय सोपे करण्यासाठी आणि गुंतवणुकीशी निगडित बचत प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. ही सेवा अनुभवी तसेच प्रथमच गुंतवणूक करणाऱ्या दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी तयार कर

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27 ° C
27 °
27 °
54 %
2.6kmh
20 %
Thu
26 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
26 °

Most Popular

You cannot copy content of this page