कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत
शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त भाविक प्रवाशांसाठी ‘श्री दुर्गादर्शन विशेष बस सेवा’ सुरु करण्यात येत आहे. या विशेष बस सेवेचा आगाऊ आरक्षण तिकीट विक्री शुभारंभ शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडील पोलीस निरिक्षक नंदकुमार मोरे यांचे हस्ते केएमटीच्या श्री शाहू मैदान पास वितरण केंद्र येथे करण्यात आला.
या बस सेवेचा प्रथम पास खरेदी करण्यासाठी सौ. प्रियंका उदय पाटील, अर्चना शिंदे, सौ. साधना उकुंडे, सौ. सुधा जाधव व भाविक प्रवासी उपस्थित होते. यावेळी दुर्गादर्शन बस सेवा प्रमुख सुनिल पाटील, वाहतूक निरिक्षक नितीन पोवार, स्थानक प्रमुख संग्राम काशीद प्र. वाहतूक नियंत्रक पुरुषोत्तम साबळे, सेवानिवृत्त वाहतूक निरिक्षक सुनिल जाधव, गजानन कोळी, धनंजय पाटील, अमोल भोसले, नाना भीसले, हेमंत हेडाऊ, मोहन मुदगूण तसेच के.एम.टी. कर्मचारी व प्रवासी नागरिक उपस्थित होते.
कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत नवरात्रौत्सवानिमित्त ‘श्री दुर्गादर्शन विशेष बस सेवा’ सुरु करणेत येत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी श्री शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्र येथे दुर्गादर्शन सेवेचे प्रमुख सुनिल पाटील – ९८९००८०७९०, नितीन पोवार – ९४२२५८९८७८, ऑफीस – ०२३१-२६४४५६६ व ०२३१-२६४४५६८, पी. बी.साबळे – ८४८२८३८५०४ यांच्याशी संपर्क साधावा.
——————————————————-
केएमटी ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बस सेवेच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ
Mumbai
light rain
27
°
C
27
°
27
°
84 %
4.3kmh
100 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°
Sat
30
°
Sun
30
°

