कोल्हापूर :
आर. जी. चौगुले यांनी ३४ वर्षे सेवा प्रामाणिकपणे पार पाडली. त्यांनी संस्थेशी एकनिष्ठ राहून समाजाप्रती मी देणे लागतो, या भावनेने आपली सेवा बजावली आहे. आपणास दिलेले काम प्रामाणिकपणे पार पाडा. महाविद्यालय माझे आहे असे समजून काम करा, तरच असा सेवानिवृती सदिच्छा समारंभ होतो. सेवानिवृती नंतरचे जीवन आरोग्यपूर्ण व्हावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी आर. जी. चौगुले यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.
विवेकानंद कॉलेजच्या प्रशासकीय स्टाफतर्फे आर. जी. चौगुले यांचा प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्काराला उतर देताना आर. जी. चौगुले यांनी संस्थेने व महाविद्यालयाने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थनेने झाली. प्रास्ताविक व स्वागत प्रशासकीय कर्मचारी प्रतिनिधी व सहाय्यक ग्रंथपाल हितेंद्र साळुंखे यांनी केले. मानपत्राचे वाचन महाविद्यालयाचे अमित साळुंखे यांनी केले. आभार अधीक्षक संजय दळवी यांनी मानले. सुत्रसंचालन अमर जाधव व बी. आर. करपे यांनी केले.
याप्रसंगी प्रा. एन. आर. रानभरे, प्रा. किरण पाटील, अनिल पवार, सी. बी. दोडमणी, प्रा. एस. पी. थोरात, आर. जी. चौगुले यांचा मुलगा सुशांत व मुलगी राधिका यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी डॉ. श्रुती जोशी, मुरलीधर गावडे, कॅप्टन सुनिता भोसले, प्राध्यापक व प्रशासकीय वर्ग उपस्थित होता.
विवेकानंदमध्ये आर. जी. चौगुले यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
31
°
C
31
°
29.9
°
66 %
3.1kmh
12 %
Wed
30
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

