Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस येथे 'फिनिक्स २०२५' स्पर्धा उत्साहात

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस येथे ‘फिनिक्स २०२५’ स्पर्धा उत्साहात

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक महाविद्यालय, तळसंदे येथे ‘फिनिक्स २०२५’ ही तांत्रिक स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त ‘अभियंता दिना’चे औचित्य साधून स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ५३५ हून अधिक पदविका विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे उदघाटन डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांच्या हस्ते झाले. ‘फिनिक्स’ स्पर्धेत सि प्रो मॅक्स, क्वीझ स्पर्धा, डिबेट स्पर्धा, रेडो ड्रॉविंग, पोस्टर प्रेझेंटेशन आणि रांगोळी अशा विविध स्पर्धा घेण्यात आला. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचे तांत्रिक ज्ञान, विविध तांत्रिक संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
‘फिनिक्स २०२५’ मध्ये सि प्रो मॅक्स स्पर्धेत तारीक नसार्डी याने प्रथम तर गीत टिकपुर्ले हिने द्वितीय क्रमांक मिळवला. डिबेट स्पर्धेत तोयबा मुजावर, रेणू पाटील, शिफा पठाण, सारा मौलवी यांनी प्रथम तर  साक्षी साळुंखे, आर्या पाटील, श्रावणी पाटील, ऋतुजा राऊत यांच्या संघाने द्वितीय स्थान मिळवले. क्वीझ स्पर्धेत विक्रांत पाटील प्रथम, ओम पाटील, राजवर्धन पाटील यांनी द्वितीय, पोस्टर प्रेसेंटेशनमध्ये तानिश कुलकर्णी प्रथम तर समीक्षा पाटील, श्रावणी पाटील, श्रीष्ठा पाटील यांनी द्वितीय, रेडो ड्रॉविंगमध्ये प्रियांका शेलवाने प्रथम तर  नदीला मुल्ला, प्रज्वल समुद्रे यांनी द्वितीय, रांगोळी स्पर्धेत मधुरा पाटील, मृणाल परब यांनी प्रथम तर समीक्षा पाटील हिने द्वितीय स्थान मिळवले.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा. सुरज पावसकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनिल बोकेफोडे यानी केले तर आभार उपप्राचार्या प्रा. कलिका पाटील यांनी मानले. प्लेसमेंट अधिकारी प्रा. अक्षय खामकर, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.हसंस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
Mumbai
mist
28 ° C
28 °
27.9 °
83 %
2.6kmh
75 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page