Homeशैक्षणिक - उद्योग डीवायपी साळोखेनगरच्या दोन विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाचे विशेष पुरस्कार

डीवायपी साळोखेनगरच्या दोन विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाचे विशेष पुरस्कार

कोल्हापूर :
डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय साळोखेनगरच्या दोन विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठातर्फे विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्य आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठाकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अविनाश संजय राठोड व ओंकार सुहास चौण्डकर यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे.
विविध शैक्षणिक निकष, प्रकल्प सादरीकरण, संशोधन कार्य आणि सामाजिक योगदानाच्या आधारे हे पुरस्कार देण्यात आले. यामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत अभियंत्रिकीच्या सर्वच विभागातून प्रथम वर्षासाठी ९०.६३% गुण मिळवणारा अविनाश संजय राठोड  ‘यशवंतराव पांडुरंग पवार पुरस्कार’ या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. शैक्षणिक कामगिरी, नाविन्यपूर्ण प्रकल्प व सामाजिक उपक्रमातील सहभाग आदी निकषावर हि निवड करण्यात आली आहे. तर सीबीसीएस शैक्षणिक प्रणालीमधून विद्युत अभियंत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या ओंकार सुहास चौण्डकर (८१.९१ % ) याला ‘सुंदरराव पांडुरंग कारेकर विद्युत अभियांत्रिकी पुरस्कार’ घोषित करण्यात आला.
या विद्यार्थ्यांना कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉ. विद्या अब्दुलपुरकर, प्रथम वर्ष विभाग प्रमुख अमर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
79 %
3.1kmh
11 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page