कोल्हापूर :
विवेकानंद कॉलेज (अधिकार प्रदत्त स्वायत्त) येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात ६० पेक्षा अधिक रानभाज्यांचा समावेश होता.
या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचा समावेश करण्यात आला होता. या उपक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्यां सौ. शुभांगी गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यानिमित्ताने मार्गदर्शन करताना सौ. गावडे यांनी सांगितले की, रानभाजी हा स्थानिक आहारातील महत्त्वाचा घटक असून यामध्ये पोषण मूल्य आणि औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळतात. विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या माध्यमातून या परंपरेचे जतन करणे गरजेचे आहे.
रानभाज्यांच्या या प्रदर्शनात कुर्डू, पात्री, शेवगा, तांदळी, घोळ, आंबुशी, भारंगी, गोमाटी, कुडा, मोरशेंड, बांबू कोंब, कपाळ फोडी, गुळवेल, हाडसांधी, नाल, शतावरी, मायाळू, कोर्टा तसेच कर्टुले अशा ६० पेक्षा अधिक रानभाज्यांचा समावेश होता. या भाज्यांचे औषधी गुणधर्म, पोषण मूल्य, वापराच्या पद्धती व पाककृती यासंबंधीची माहिती फलकाद्वारे देण्यात आली होती.
वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी. टी. दांगट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अशा उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धन, स्थानिक ज्ञानाचे जतन व जैवविविधतेचे महत्त्व आढळून अधोरेखित होते, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संयोजन विभागातील प्राध्यापकांनी केले.
न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31
°
C
31
°
28.9
°
42 %
4.6kmh
5 %
Thu
29
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

