कोल्हापूर :
कोल्हापूर शहरातील पात्र व निवड केलेल्या लाभार्थ्यांना ‘अलिम्को’ मार्फत आवश्यक साहित्याचे वाटप रविवारी (दि.१४) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विवेकानंद कॉलेज, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित राहणार असून त्यांच्याही हस्ते दिव्यांगांना साहित्याचे वाटप केले जाणार आहे. इतर तालुकास्तरीय दिव्यांगांना त्या-त्या तालुक्यात साहित्याचे वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाच्या आयोजना बाबत बैठक घेण्यात आली. नियोजन आढावा बैठकीला संबंधित कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी, अलिम्को संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पात्र व निवड केलेल्या सर्व दिव्यांगांना निरोप देणे, त्यांची ने-आण करणे यासाठी योग्य नियोजन करण्याबाबत सूचना केल्या. कार्यक्रमस्थळी कोणतीही गैरसोय होवू देवू नका यासह प्रत्येक कामांसाठी नेमलेल्या समित्यांना सूचना केल्या. स्टेज, नोंदणी, बैठक, निमंत्रण, मंडप, संपर्क, वाहतूक,स्वच्छता, सुरक्षा, आरोग्य, वाहनतळ इ.समित्या नेमण्यात आल्या आहेत. अलिम्को मार्फत दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार सहाय्यक साधने आणि साहित्याचे वाटप केले जाते. यामध्ये कृत्रिम अवयव, व्हीलचेअर, कर्णबधिरांसाठी श्रवणयंत्रे, दृष्टिहीनांसाठी काठी, तसेच इतर उपकरणे यांचा समावेश असतो.
दिव्यांग लाभार्थ्यांना रविवारी साहित्य वाटप
Mumbai
mist
28
°
C
28
°
27.9
°
83 %
2.6kmh
75 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°