कोल्हापूर :
तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाचे स्मरण करत हॉकीसम्राट मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहून राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या. कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कुलसचिव प्रा. डॉ. जे. ए. खोत, डीन डॉ. मुरली भूपती यांच्यासह सर्व असोसिएट डीन, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक बळकटी आणि खेळांविषयी सकारात्मक दृष्टिकोन यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.
कुलगुरू प्रा. डॉ. प्रथापन म्हणाले की, खेळ ही प्रेरणादायी शक्ती असून ती व समाजात शांतता व सर्वसमावेशकता निर्माण करते. कुलसचिव प्रा. डॉ. जे. ए. खोत म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्टता, मैत्री, आदर, धैर्य व समता यांची जडणघडण खेळांमधून होते.
क्रीडा उपसंचालक पूनम खाडे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या शिस्तप्रिय व देशभक्तिपूर्ण जीवनमूल्यांवर मार्गदर्शन केले.
बी. टेक. अॅग्री, बी.एससी. अॅग्री, टेक्निकल कॅम्पस आणि विद्यापीठकडून फुटबॉल सामन्यांमध्ये ९ संघांनी भाग घेतला. फुटबॉल सामन्यांमध्ये विद्यापीठाचे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज संघ विजेते ठरले. कबड्डी स्पर्धेत बी.एससी. अॅग्री कॉलेज, विद्यापीठ बी.टेक. अॅग्री विद्यापीठाचा शिवाजी महाराज संघ (सीएसई) आणि शाहू महाराज (एआयएमएल) विजेते ठरले.
यावेळी डॉ. मंगल पाटील, डॉ. शुभांगी जगताप, डॉ. सारिका वांद्रे, अनिकेत मोरे, विशाल पुणदीकर, प्रदीप पाटील, निखिल कदम, डॉ. सदाशिव कल्याण आदींसह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.4
°
C
26.4
°
26.4
°
82 %
5.7kmh
100 %
Sun
27
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°