Homeसण - उत्सवघरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत कासारवाडीचे धोंडीराम कारेकर प्रथम

घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत कासारवाडीचे धोंडीराम कारेकर प्रथम

कोल्हापूर :
कै. रेवताबाई एकावडे चॅरिटेबल ट्रस्ट व सौभाग्य अलंकार यांच्यावतीने गणेश चतुर्थीनिमित्त घेण्यात आलेल्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत कासारवाडी (ता. राधानगरी) येथील धोंडीराम कारेकर यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. त्यांनी कृष्णावतार हा देखावा सादर केला होता. स्पर्धेमध्ये एकूण २८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
राधानगरी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद एकावडे गेली वीस वर्षे ही स्पर्धा आयोजित करत आहेत. स्पर्धेत जुन्या पारंपारिक व टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू, कृष्णावतार ऑपरेशन सिंदूर, धबधबा, तिरुपती रेल्वे स्टेशन, पंढरपूर दिंडी, केदारनाथ मंदिर, इंद्र दरबार, तुकाराम गाथा, महालक्ष्मी मंदिर, राधानगरी डॅम आदी विषयावरती देखावे सादर करण्यात आले होते.
स्पर्धेचा निकाल असा द्वितीय क्रमांक विभागून – शुभम कृष्णा साळवी (कासारवाडी) व रोहित एकनाथ पाटील (साईनगर), तृतीय क्रमांक विभागून – अवधूत गणपती सुतार (बनाचीवाडी), प्रवीण तिरवडे (राधानगरी), चतुर्थ क्रमांक विभागून – वैष्णवी पंकज सुतार (बनाचीवाडी), अमर चौगुले (कुडुत्री), पाचवा क्रमांक विभागून – माधुरी उत्तम चांदम (शेटकेवाडी), श्रुतिका ऋतुराज हुजरे (गुडाळवाडी). तसेच बी. एम. पताडे (बनाचीवाडी), भूमि भूषण चौगले (राधानगरी), गणेश पाटील (फेजीवडे), नयन आयरे (आयरेवाडी), विनोद बाळासो पाटील (शेटकेवाडी) यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे परीक्षण सुभाष चौगले (कुडूत्री), नामदेव कुसाळे (चक्रेश्वरवाडी) व प्रसाद एकावडे (राधानगरी) यांनी केले. सर्व स्पर्धेतील विजेत्यांना लवकरच मान्यवरांच्या हस्ते चषक व फेटा देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद एकावडे यांनी दिली.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.4 ° C
26.4 °
26.4 °
82 %
5.7kmh
100 %
Sun
27 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page