• शिवसेनेच्यावतीने साखर पेढे वाटून आनंदोत्सव
कोल्हापूर :
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्यातील रु.१४३.९० कोटींच्या विकास कामांच्या आराखड्यास शासनाने गुरुवारी प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल शिवसेनेने आनंदोत्सव साजरा केला. श्री अंबाबाई मंदिर घाटी दरवाजा परिसरात भाविकांना वाद्याच्या गजरात साखरे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
याबाबत तमाम कोल्हापूरवासीय आणि अंबाबाई भक्तांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महायुती सरकारचे आभार शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी मानले.
यावेळी शहरप्रमुख रणजीत जाधव, महानगरसमन्वयक कमलाकर जगदाळे, शहर समन्वयक सुनील जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, रणजीत मंडलिक, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, निलेश हंकारे, प्रभू गायकवाड, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, हर्षल सुर्वे, सचिन पाटील, अमित चव्हाण, टिंकू देशपांडे, क्षितीज जाधव, क्रांतीकुमार पाटील, सौरभ कुलकर्णी आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मान्यता
Mumbai
smoke
28
°
C
28
°
26.9
°
51 %
3.6kmh
20 %
Thu
27
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

