Homeशैक्षणिक - उद्योग रिलायन्स फाउंडेशनची वार्षिक शिष्यवृत्ती जाहीर 

रिलायन्स फाउंडेशनची वार्षिक शिष्यवृत्ती जाहीर 

• अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर २०२५
कोल्हापूर :
रिलायन्स फाउंडेशनची वार्षिक शिष्यवृत्ती पुन्हा एकदा जाहीर झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी एकूण ५१०० विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी केवळ नियमित प्रथम वर्षातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर २०२५ आहे.
२०२२ साली रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी धीरुभाई अंबानी यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त १० वर्षांत ५०,००० शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली होती. त्याच परंपरेत यावर्षी ५,००० पदवी विद्यार्थ्यांना व १०० पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना २ लाख रुपयांपर्यंत अनुदान तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ६ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळेल.
पदव्युत्तर शिष्यवृत्ती अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि जीवन विज्ञान या निवडक क्षेत्रांतील भारतातील सर्वोत्तम १०० विद्यार्थ्यांना दिली जाईल. यामधून राष्ट्रीय विकास आणि जागतिक प्रगतीसाठी महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण व संशोधनास प्रोत्साहन दिले जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश भविष्यकालीन नेतृत्व घडवणे असून अशी पिढी तयार करणे आहे जी समाजाभिमुख, पर्यावरणपूरक आणि डिजिटल विचारसरणीची असेल.
शिष्यवृत्तीबाबत अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी scholarships.reliancefoundation.org या संकेतस्थळाला भेट द्या.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
27 ° C
27 °
27 °
83 %
5.5kmh
41 %
Sat
27 °
Sun
27 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page