Homeशैक्षणिक - उद्योग ‘गोकुळ’मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

‘गोकुळ’मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्यावतीने ७९वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. गोकुळ प्रकल्‍प गोकुळ शिरगाव येथे संघाचे चेअरमन नविद हसन मुश्रीफ यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्यात आले. यावेळी संचालक किसन चौगले, प्रकाश पाटील, चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले आदी उपस्थित होते.
यावेळी चेअरमन नविद मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच जिल्ह्यातील दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वितरक, ग्राहक व कर्मचारी यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गोकुळ प्रकल्‍पाबरोबरच संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथील ध्‍वजारोहण संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचे हस्‍ते तर लिंगनूर चिलिंग सेंटर संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, तावरेवाडी चिलिंग सेंटर संचालक बयाजी शेळके, गोगवे चिलिंग सेंटर संचालक कर्णसिंह गायकवाड, शिरोळ चिलिंग सेंटर संचालक सुजित मिणचेकर, महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी संचालक बाबासाहेब चौगले, महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखाना कागल संचालक मुरलीधर जाधव व बोरवडे चिलिंग सेंटर ज्येष्ठ कर्मचारी अशोक डोंगळे यांच्‍या हस्‍ते व संघाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सहा.महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदिप पाटील, व्‍यवस्‍थापक (प्रशासन) रामकृष्ण पाटील, व्यवस्थापक (पशुसंवर्धन) डॉ. प्रकाश साळुंखे, व्यवस्थापक (संकलन) दत्तात्रय वाघरे, डॉ. प्रकाश दळवी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम व संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
22 ° C
22 °
22 °
60 %
1.5kmh
0 %
Sat
27 °
Sun
27 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page