Homeशैक्षणिक - उद्योग राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

कोल्हापूर :
कसबा बावडा येथील मनपा. राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक ११ येथे ७९वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी निवृत्ती साळोखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी संगीतमय कवायत सादर केली. याचबरोबर आदित्य कांबळे,अमृता ठोंबरे, वेदिका गणेशाचार्य, श्रावणी पवार, जानवी दळवी, आराध्या पवार, सई चव्हाण, अखिलेश चौगुले, किमया चौगुले या विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दुडय्या गनिकोप्पा, समिती सदस्य शितल पाटील, कांचन हुलस्वार, सोनाली गणेशाचार्य, व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड, केंद्रमुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील आदींसह सर्व शिक्षक, विद्यार्थी, सेवक उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील व प्रमुख पाहुणे निवृत्ती साळोखे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. यावेळी सतीश मोरे यांनी विद्यार्थ्यांना केळी तर दुडय्या गनिकोप्पा व अभिजित मोहिते यांनी सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रावसाहेब कीर्तीकर यांनी केले. उत्तम कुंभार यांनी प्रास्ताविक केले. अमित पोटकुले यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
28.9 ° C
28.9 °
28.9 °
78 %
4.2kmh
78 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page