कोल्हापूर :
अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने देशातील शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत स्कु न्यूज मार्फत जयपूर येथे झालेल्या ग्लोबल एज्युकेशन अवॉर्ड कार्यक्रमांमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रोथ फोकस एज्युकेशनल अवॉर्ड २०२५ प्राप्त केला.
अर्थातच संयुक्त राष्ट्र संघाने ठरवलेली उद्दिष्टे यांचा शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक वापर करणे यासाठी दिला जाणारा हा अवॉर्ड आहे. जयपूर या ठिकाणी झालेल्या या सन्मान सोहळ्यात संजय घोडावत शिक्षण समुहाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी प्रमुख अतिथी रवी संतलानी यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. यावेळी एसजीआयएसचे लकी सुराणा हे उपस्थित होते. जीवन कौशल्य शिक्षण, सर्वसमावेशक शिक्षण आणि सामुदायिक व सहयोगी उपक्रम व भविष्यातील गरजा ओळखून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण दिल्याबद्दल हा पुरस्कार प्राप्त झाला.
यासंबंधी विश्वस्त विनायक भोसले म्हणाले की, चेअरमन संजय घोडावत यांची दूरदृष्टी व संचालिका सस्मिता मोहंती यांचे परिश्रम व विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न यामुळेच हा सन्मान प्राप्त झाला आहे. तसेच विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, नवोपक्रम, उत्कृष्ट निकाल, आणि शिक्षकांचे समर्पण, प्रायोगिक शिक्षणपद्धती, उच्च शिक्षित शिक्षक, जागतिक दर्जाचे शिक्षण या सर्व गोष्टीला आम्ही महत्व देतो.
या पुरस्काराबद्दल चेअरमन संजय घोडावत व सेक्रेटरी श्रेणीक घोडावत यांनी विश्वस्त विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती यांच्या शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच, बोर्डिंग स्कुलचे प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन, डे बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य अस्कर अली, ज्यु कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, आणि पालकांचेही त्यांनी अभिनंदन केले व आभार मानले.
——————————————————-
घोडावत इंटरनॅशनल स्कूलला एसडीजी फोकस एज्युकेशनल एक्सलन्स पुरस्कार
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
27
°
C
27
°
27
°
83 %
5.5kmh
41 %
Sat
27
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°