• आ. सतेज पाटील यांनी मंत्रालय पातळीवर संघटनेची बैठक लावण्याबाबत दिली ग्वाही
कोल्हापूर :
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांकरीता एल्गार पुकारला असून शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने मागण्या मान्य न केलास १८ ऑगस्टला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रापंचायत कर्मचाऱ्यांनी दिला. तर या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने देखील पाठिंबा दिला असून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. मंत्रालय पातळीवर संघटनेची बैठक लावण्याबाबत, आपण पाठपुरावा करु अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करण्यात यावे त्याचबरोबर राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे ३ हजार ४१० रूपये राहणीमान भत्ता लागू करून मागील फरकाची रक्कम खात्यावर जमा करण्यात यावी. यासह इतर विविध मागण्याकरिता कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्यावतीने शुक्रवारी जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य झाल्या नाही, तर १८ ऑगस्टला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेसने देखील पाठिंबा दिला आहे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी या आंदोलनात सहभागी होत, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष सम्राट मोरे यांनी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. वेळोवेळी शासनाचे याकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र अद्यापही या मागण्या प्रलंबित असल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, कॉम्रेड दिलीप पवार, कॉम्रेड रघुनाथ कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बबन पाटील, रवी कांबळे अशोक पाटील, परशराम जाधव, अशोक गेंगे यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होते.
——————————————————-
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलन
Mumbai
overcast clouds
26
°
C
26
°
26
°
89 %
5.8kmh
100 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°