कोल्हापूर :
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या (हॉटेल मॅनेजमेंट) अंतिम वर्षात शिकणाऱ्या १७ विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेलमध्ये नोकरीसाठी निवड झाली. विविध हॉटेल व्यवस्थापनाकडून मुलाखतीद्वारे ही निवड करण्यात आली.
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीतर्फे बी. एस. सी. इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज् हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम घेण्यात येतो. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे यावर भर दिला जातो. त्यासाठी विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रात्यक्षिक कामाचा अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळवून दिली जाते. याचा उत्तम फायदा या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी झाला आहे. कोल्हापूर, पुणे, मुंबई, बेळगाव येथील पंचतारांकित हॉटेल्स चालवणाऱ्या कंपन्यांनी महाविद्यालयाच्या १७ विद्यार्थ्यांची निवड केली असल्याची माहिती प्राचार्य रुधीर बारदेस्कर यांनी दिली. या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सुरज यादव यांचे मार्गदर्शन लाभले.
सयाजी हॉटेल, सिनुना रेस्टॉरंट, वेस्ट इन, डबल ट्री बाय हिल्टन, हिल्टन गार्डन इन, मॅरिओट एक्सिक्यूटिव्ह, आय टी सी वेलकम हॉटेल, सेंट रेगीस अशा नामवंत हॉटेल्समध्ये या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.
——————————————————-
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या १७ विद्यार्थ्यांची निवड
RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
27.2
°
C
27.2
°
27.2
°
81 %
3.3kmh
67 %
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
29
°