Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंद कॉलेजचा कळंबा तलाव परिसरात देशी वृक्षबिया रोपण उपक्रम

विवेकानंद कॉलेजचा कळंबा तलाव परिसरात देशी वृक्षबिया रोपण उपक्रम

कोल्हापूर :
येथील विवेकानंद कॉलेजच्या आर्ट्स – कॉमर्स विभागामार्फत पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा या विषयाअंतर्गत देशी वृक्षांच्या बिया रोपणाचा उपक्रम कळंबा तलाव परिसरात राबविण्यात आला. या पर्यावरणपूरक उपक्रमामध्ये इयत्ता १२वीच्या वर्गातील ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी यापूर्वीच जमा केलेल्या देशी वृक्षांच्या ३५ विविध प्रजातींच्या बियांचा या रोपणामध्ये समावेश होता. यामध्ये चिंच, करंज, खैर, आंबा, कडुनिंब, बहावा, काटेसावर, ताम्हण, बेल, सीताफळ, रामफळ, जांभूळ, काजू इत्यादींचा समावेश होता. यासोबतच येथील निसर्गरम्य परिसरात विद्यार्थ्यांनी विविध वनस्पती, कीटक, वृक्ष प्रजाती, पक्षी यांचाही चिकित्सक अभ्यास करत आनंद घेतला.
या उपक्रमाचे आयोजन विभागप्रमुख प्रा. सौ. शिल्पा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा विषय शिक्षक अनिल धस यांनी नियोजन केले. या पर्यावरण पूरक उपक्रमास प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ज्येष्ठ प्राध्यापक विश्वंभर कुलकर्णी व प्रा. सौ. माधवी देशपांडे यांनीही मोलाचे सहकार्य केले. स्टाफ सेक्रेटरी बी. एस. कोळी व सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांचेही विशेष  सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.7 ° C
27.7 °
27.7 °
79 %
4.2kmh
88 %
Sun
28 °
Mon
27 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
26 °

Most Popular

You cannot copy content of this page