Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकला विद्यार्थ्यांची प्रथम पसंती

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकला विद्यार्थ्यांची प्रथम पसंती

कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई संलग्नित डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम पसंती दिली आहे. पर्यावरणपूरक कॅम्पस, आधुनिक पायाभूत सुविधा, सातत्याने गुणवत्तापूर्ण निकालासोबत उत्तम नोकरीची हमी यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये महाविद्यालय प्रथम पसंतीक्रमाचे ठरले आहे.
पॉलिटेक्निकमध्ये सर्व शासकीय शिष्यवृत्ती, ई.बी.सी. सवलती तसेच टॉप मेरिटच्या विद्यार्थ्यांना ‘सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप’ उपलब्ध असल्यामुळे सर्वोच्च मेरिटच्या विद्यार्थ्यांनी प्रथम पसंतीक्रम दिला आहे. पहिल्या प्रवेश फेरीमध्ये ८० टक्के प्रवेश निश्चिती झाली असल्याने पॉलिटेक्निकने आपली गुणवत्ता पुन्हा सिद्ध केल्याचे प्रतिपादन कॉलेजचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांनी केले. यावर्षी एमएसबीटीई बोर्ड आयोजित बाह्य आवेक्षणमध्ये कॉलेजच्या सर्व कोर्सेसना ‘अतिउत्तम’ रिमार्क मिळाला असल्याची माहितीही डॉ. पावसकर यांनी दिली.
यावर्षी प्रथम वर्ष कॉम्प्युटर विभागातून टॉप मेरिटच्या वृषाली पाटील ९५.४०%, समीक्षा पाटील ९२.२०%,  फैजआलम महाभारी ९२. ६०%, इलेक्ट्रिकल विभागात लालफेला पाटील ९२.५०%, रिया पाडळकर ९०.४० टक्के, इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन विभागात गायत्री हसमणीस ८६.८०% तसेच मेकॅनिकल विभागातून करिष्मा शेट्टी ९२% आणि इंद्रजीत तांदळे ८९. ६०% या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला. संस्थेचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर, पॉलिटेक्निक उपप्राचार्या के. एम. पाटील, एफसी इन्चार्ज प्रा. एन. एम. मुल्ला, प्रा. व्ही. व्ही. चौगुले यांनी सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आम. सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
32 ° C
32 °
29.9 °
40 %
3.1kmh
0 %
Mon
32 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
27 °

Most Popular

You cannot copy content of this page