कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचीच सत्ता येईल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. खासदार महाडिक यांच्या नियोजनातून नागदेववाडी परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेसाठी ८५ लाखांच्या निधीतून हाय मास्ट सोलर दिव्यांची यंत्रणा मंजूर केली आहे. जिल्हा परिषद कॉलनीतील या हाय मास्ट सोलर लाईटच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.
येथील अनेक मंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या. मात्र आम्ही प्रत्यक्ष विकासकामे करून दाखवल्याचा टोला खा. महाडिक यांनी विरोधकांना लगावला.
खा.धनंजय महाडिक यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी ७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यापैकी ८५ लाखांचा निधी त्यांनी करवीर तालुक्यातील नागदेववाडी गावासाठी मंजूर केला आहे. त्यातून नागदेववाडी परिसरातील दत्तनगर आणि अर्चना पार्कसाठी १० लाख, जय भवानी कॉलनीसाठी २० लाख, शिवरत्न कॉलनीसाठी १० लाख, जिल्हा परिषद कॉलनी आणि दत्त कॉलनीसाठी १५ लाख, शिंदे कॉलनी, शिवतेज कॉलनी, महालक्ष्मी पार्क, अयोध्या कॉलनी आणि ओम पार्क यांच्यासाठी ३० लाख असा एकूण ८५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
या निधीतून नागदेववाडी परिसरात १७ ठिकाणी हायमास्ट सोलर लाईटची उभारणी करण्यात येणार आहे. या हाय मास्ट सोलर लाईटचे एकत्रित भूमीपूजन आणि शुभारंभ शनिवारी नागदेववाडीपैकी जिल्हा परिषद कॉलनीमध्ये श्री नागेश्वर मंदिर परिसरात खासदार धनंजय महाडिक आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आला.
दरम्यान, खा. धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यासह या परिसराचा विकास करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्यांचे मनःपूर्वक आभार मानत असल्याचे यावेळी आमदार चंद्रदिप नरके यांनी सांगितले. महायुतीच्या माध्यमातून खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यासह देशांमध्ये मोठी विकासकामे केली आहेत. हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अर्चना चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र दिवसे, बी. के. जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी नागदेववाडीच्या सरपंच अमृता पोवार, समीर पोवार, विनय पाटील, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पोतदार, सगुणा बाटे, डॉ. के. एन. पाटील, विश्वास निगडे, मोहन कांबळे, अनंत खोपडे, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य दत्तात्रय आवळे, प्रदीप बाटे, किशोर मुसळे यांच्यासह परिसरातील महिला आणि नागरिक उपस्थित होते.
सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल : खा. धनंजय महाडिक
Mumbai
light rain
27.8
°
C
27.8
°
27.8
°
82 %
5.8kmh
34 %
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°