कोल्हापूर :
श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक जाणीवेने उपक्रम राबवण्यात आला. गुरुवारी (दि.२६) सातारा जिल्ह्यातील लोणंद व फलटण येथे वारकऱ्यांना दूध पावडर, ५ हजार बॅग, टोपी आणि दिनदर्शिका या साहित्याचे मोफत वाटप गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, शशिकांत पाटील- चुयेकर, बयाजी शेळके व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले कि, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशाचे प्रतीक असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात गोकुळतर्फे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत विविध उपक्रम राबवले जात आहेत. पालखी सोहळा हा आपल्या सांस्कृतिक अस्मितेचा भाग आहे. यामध्ये जिल्ह्यातील दूध उत्पादक वारकरी म्हणून सहभागी असतात, त्यामुळे या उपक्रमातून त्यांच्यापर्यंत गोकुळची साथ पोहोचवणे हे संघाचे सामाजिक कर्तव्य समजूनच हा उपक्रम राबवला जात आहे.
यावेळी बिद्री साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन मनोज फराकटे, रयत संघाचे चेअरमन सचिन पाटील, माधव पाटील, सुनिल पाटील, राहुल पाटील, मयूर आवळेकर, निलेश शिंदे, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, मार्केटिंग विभागाचे सुनिल गायकवाड, मानसिंग चौगले तसेच विविध दिंडी प्रमुख व वारकरी उपस्थित होते.
‘गोकुळ’ तर्फे वारकऱ्यांना लोणंद व फलटण येथे साहित्य वाटप
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.5
°
C
27.5
°
27.5
°
82 %
8.4kmh
100 %
Tue
28
°
Wed
27
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°