कोल्हापूर :
डेक्कन जिमखानातर्फे आयोजित व आयटीएफ, एआयटीए, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे सीफूडस-डेक्कन जिमखाना-एमएसएलटीए आयटीएफ जे १०० कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत लक्ष्य त्रिपाठी, आर्यन कीर्तने, आरव ढेकियाल, त्रिशिक वाकलकर, अंशुल पुजारी, सृष्टी सूर्यवंशी, अहाना चौधरी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत बिगर मानांकित लक्ष्य त्रिपाठी याने अमेरिकेच्या पाचव्या मानांकित आरुष कोटेचा ०-६, ६-४, १०-८ असा तीन सेटमध्ये पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. अव्वल मानांकित आरव ढेकियालने हृषव रावलहचा ६-१, ६-४ असा तर, आर्यन किर्तने याने चिन्मय ठाकरेचा ६-४, ६-२ असा पराभव करून दुसरी पात्रता फेरी गाठली. त्रिशिक वाकलकर याने तुषार जसवानीचा टायब्रेकमध्ये ६-४, ७-६(३) असा कडवा प्रतिकार केला. अंशुल पुजारीने सर्वज्ञ सरोदेला ६-३, ६-४ असे नमविले.
मुलींच्या गटात सृष्टी सूर्यवंशी हिने स्वरा जावळेवर ६-२, ६-० असा विजय मिळवला. आठव्या मानांकित अहाना चौधरीने जेमिमा रेबेका क्रिस्टीन जॉनचे आव्हान ६-४, ६-२ असे मोडीत काढले. मेघना जीडी हिने साजी जैनला ६-१, ६-१ असे सहज पराभूत केले.
——————————
टेनिस स्पर्धेत लक्ष्य, आर्यन, आरव, त्रिशिक, अंशुल यांची विजयी सलामी
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26
°
C
26
°
25.5
°
50 %
2.1kmh
68 %
Sun
28
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
30
°

