Homeशैक्षणिक - उद्योग घोडावत इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूल व ज्युनि. कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

घोडावत इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूल व ज्युनि. कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

कोल्हापूर :
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई बोर्डिंग स्कुल व ज्युनिअर कॉलेज यांचा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संजय घोडावत स्टेडियमवर या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी यशवंत इंटरनॅशनल स्कूल, वारणा कोडोलीचे प्राचार्य मंदार पसरणीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच यशवंत इंटरनॅशनल स्कूलचे सल्लागार कमिटी मेंबर प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या संचालिका व प्राचार्या सस्मिता मोहंती होत्या. यावेळी बोर्डिंगचे प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रीडाध्वज पूजन, ज्योत प्रज्वलन आणि शिस्तबद्ध संचलनाने झाली. विद्यार्थ्यांनी विविध खेळांचे प्रतिनिधित्व करणारे आकर्षक संचलन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी मंदार पसरणीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,  खेळामुळे शिस्त, सांघिक भावना, जिद्द आणि आत्मविश्वास या गुणांचा विकास होतो. अभ्यासाइतकेच खेळालाही जीवनात महत्त्व असून विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्ती जोपासत जीवनात यश संपादन करावे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संचालिका व प्राचार्या सौ. सस्मिता मोहंती यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो, तसेच त्यांच्यात आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सांघिक भावना विकसित होते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विविध क्रीडा स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26 ° C
26 °
25.5 °
50 %
2.1kmh
68 %
Sun
28 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
30 °

Most Popular

You cannot copy content of this page