• ५ डिसेंबरला पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन समारंभ
कोल्हापूर :
कै. सौ. हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट, राज प्रकाशन व राजर्षी शाहू अध्यासन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या, विवेकवादी विचारवंत सरोज नारायण (एन. डी.) पाटील (माई) यांना देण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण बालकल्याण संकुलचे ज्येष्ठ विश्वस्त सुरेश शिपूरकर यांच्या हस्ते शनिवार ५ डिसेंबरला सायंकाळी ४:३० वाजता, साने गुरुजी वसाहत येथील सूर्यवंशी कॉलनीतील मृत्युंजय सांस्कृतिक सभागृह येथे होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. सन्मानचिन्ह, ग्रंथ, शाल व रोख ११,००० रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सरोज पाटील या रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या सदस्यपदी कार्यरत असून शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. तसेच त्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.
पवार ट्रस्टच्या खजिनदार श्रध्दा पवार यांचे “जननायक राजर्षी शाहू महाराज” या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व लेखिका वसुधा जयसिंगराव पवार असणार आहेत. या कार्यक्रमासाठी श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सुमनताई वसंतराव देशमुख, श्रीराम ज्ञानपीठ, वाशीच्या संचालिका अनिता भीमराव पाटील, नगरसेविका संगीता संजय सावंत आणि मंत्रालयातील अवर सचिव राजकुंवर संदीप डफळे-पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे.
पत्रकार परिषदेला प्रा. डॉ. दिग्विजय पवार, श्रीराम ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष बी. ए. पाटील, प्राचार्य डॉ. दिनकर पाटील, विलास पाटील, पांडुरंग माळी उपस्थित होते.
——————————
सरोज पाटील यांना ‘पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार’ जाहीर
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26
°
C
26
°
25.5
°
50 %
2.1kmh
68 %
Sun
28
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
30
°

