Homeइतरडी. वाय. पाटील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी अनुभवला कला, छायाचित्रणातून पन्हाळगडाचा इतिहास

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी अनुभवला कला, छायाचित्रणातून पन्हाळगडाचा इतिहास

कोल्हापूर :
इतिहास, कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कसबा बावडा, कोल्हापूर यांच्या आर्ट अँड क्राफ्ट, फोटोग्राफी आणि मूव्ही क्लबतर्फे प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी पन्हाळगडावर एकदिवसीय कृतीआधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या या कार्यशाळेत ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना रेखाटन, छायाचित्रण आणि चित्रपट माध्यमांचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासोबतच ऐतिहासिक वारसा, कलात्मक दृष्टी आणि निरीक्षण कौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली.
पारंपरिक वर्गशिक्षणाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभवातून कला आणि इतिहास समजून घेण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. तिलोत्तमा पाडळे यांनी विद्यार्थ्यांना सावली रेखाटन तंत्राची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पन्हाळगडावरील ऐतिहासिक वास्तू आणि परिसरातील विविध दृश्यांचे प्रत्यक्ष रेखाटन केले.
गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे सौंदर्य आणि स्थापत्यवैशिष्ट्ये छायाचित्रांच्या माध्यमातून टिपण्यासाठी प्रा. मकरंद काईगडे यांनी मार्गदर्शन केले. विविध कोन, प्रकाशयोजना आणि छायाचित्रण तंत्रांचा वापर करून विद्यार्थ्यांनी वास्तूंचे छायाचित्रण केले.
यावेळी पन्हाळगडाच्या रणसंग्रामाची माहिती देणारा भारतातील पहिल्या १३डी लघुचित्रपटाचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. या चित्रपटाच्या माध्यमातून ऐतिहासिक प्रसंगांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर प्रा. मनजीत जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, त्यांचे नेतृत्वगुण आणि पन्हाळगडावरील ऐतिहासिक रणसंग्राम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील,  विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संजय पवार, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. महेश शेलार यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31 ° C
31 °
28.9 °
55 %
3.6kmh
4 %
Mon
30 °
Tue
30 °
Wed
30 °
Thu
30 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page