Homeइतरपाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे यंदा उद्यान व पुष्प स्पर्धा रद्द

पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे यंदा उद्यान व पुष्प स्पर्धा रद्द

• ५ डिसेंबरला गार्डन्स क्लबचा कार्यक्रमाला जपानच्या तीन तज्ज्ञांची उपस्थिती
कोल्हापूर :
एल निनोच्या प्रभावामुळे कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ५१.९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन गार्डन्स क्लबने यंदा उद्यान व पुष्प स्पर्धांच्या स्वरूपात बदल केला आहे. उद्यान स्पर्धा न घेता नोंदणी केलेल्या बागांना भेटी देऊन सहभागींचा ५ डिसेंबर रोजी सत्कार करण्यात येणार आहे. तसेच तीन दिवसांच्या पुष्प प्रदर्शनाऐवजी एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला जपानच्या सकाटा कंपनीचे योहेई हिसाशी, गेन्या टेकेडा आणि आकिरा निशिओ हे तीन पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भारतातील कंपनीचे पदाधिकारीही सहभागी होतील.
कार्यक्रमात गार्डन्स क्लबच्या कॅलेंडर व ‘रोजेट’ वार्षिकाचे प्रकाशन, उद्यान स्पर्धकांचा सत्कार, सकाटा कंपनीचे सादरीकरण, लघुपट स्पर्धेचे स्क्रीनिंग आणि भारतीय वाद्यांच्या पार्श्वसंगीतावर १५ इकेबाना पुष्परचनांचे सादरीकरण होणार आहे.
पुष्प स्पर्धा व प्रदर्शनासाठीचा निधी कोल्हापूर महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या जलव्यवस्थापनासाठी वर्षभर वापरण्यात येणार आहे. अशी माहिती गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेस गार्डन क्लबचे उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, सचिव सुप्रिया भस्मे, वर्षा वायचळ, डॉ. रचना संपत कुमार, रविंद्र साळुंखे, नगरसेविका सृष्टी जाधव उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31 ° C
31 °
28.9 °
55 %
3.6kmh
4 %
Mon
30 °
Tue
30 °
Wed
30 °
Thu
30 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page