Homeशैक्षणिक - उद्योग सहकार महर्षि स्व. दत्ताजीराव कदम यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'श्री दत्त साखर'च्यावतीने अभिवादन

सहकार महर्षि स्व. दत्ताजीराव कदम यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘श्री दत्त साखर’च्यावतीने अभिवादन

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार आणि शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार सहकार महर्षी स्व. दत्ताजीराव बाबूराव कदमआण्णा यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या स्व. कदम आण्णांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करुन साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडीत गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व. कदमआण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्व. सा. रे. पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासही चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील यांनी, स्व. दिनकरराव यादव यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक रणजित अशोक कदम यांनी व स्व. विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास व्हाईस चेअरमन शरदचंद्र विश्वनाथ पाठक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अरुणकुमार देसाई, अनिलकुमार यादव, बाबासो पाटील, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, ॲड. प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगू गोपाळ माने-गावडे, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे, इंद्रजित पाटील, विजय सुर्यवंशी, बाळासाहेब पाटील-हालसवडे, कामगार संचालक प्रदिप बनगे, माजी नगरसेवक अजय भोसले, महादेव कुलकर्णी, उत्तम पाटील, शिवाजी पाटील-कौलवकर, महंमद मुल्ला तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई, मॅनेजर फायनान्स संजय भोसले, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, वर्क्स मॅनेजर एस. ए. चौगुले, प्रॉडक्शन मॅनेजर एम. एस. जाधव, सिव्हील इंजिनियर जयंता जंगम, सिव्हील इंजिनिअर यशवंतराव माने, अनिलकुमार सुतार, सॅनेटरी इन्स्पेक्टर बाळासाहेब गावडे, गेस्टहौस इनचार्ज शक्तिजीत गुरव, गार्डन सुपरवायझर प्रमोद पाटील, एचआर मॅनेजर जयदिप देसाई, हेड टाईम किपर अरुण पाटील, ऊर्जाकुर मॅनेजर व्ही. आर. इंगळे, स्टोअर किपर एस. व्ही. शिंदे, चिफ सिक्युरिटी ऑफिसर पी. एम. चौगुले, पीएटू चेअरमन विलास माने, आयटीआयचे प्राचार्य बी. बी. पाटील यांचेसह कामगार सोसायटी, कामगार कल्याण मंडळ, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ (इंटक), श्री दत्त भांडार, श्री दत्त ऊस तोडणी वाहतूक संघटना या संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते आणि कारखान्याचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28 ° C
28 °
28 °
32 %
5.1kmh
16 %
Thu
27 °
Fri
27 °
Sat
27 °
Sun
27 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page