Homeशैक्षणिक - उद्योग ‘गोकुळ’चे दूध महागले!

‘गोकुळ’चे दूध महागले!

• गोकुळकडून म्हैस दूध खरेदी दरात ३ रुपये तर गाय दूध खरेदी दरात २ रुपये वाढ
• म्हैस दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर ६ तर गाय दुधाच्या दरात ४ रुपयांची दरवाढ 
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)शी संलग्न दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, दुग्ध व्यवसायाला बळ मिळावे आणि दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी संघाने म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ करून दूध उत्पादकांना दिलासा देणारा हा निर्णय घेण्यात आला आहे. दि. २१ नोव्हेंबर २०२६ पासून म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर ३ रुपये, तर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपये वाढ करण्यात आली आहे. म्हैस दूध खरेदी दरात करण्यात आलेली प्रति लिटर ३ रुपयाची वाढ ही गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक दरवाढ आहे. या निर्णयामुळे संघाचे दूध संकलन वाढण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, गोकुळच्या म्हैस दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर ६ रुपयांची व गाय दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर ४ रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. (हि दरवाढ दि.२१/११/२०२६ च्या मध्यरात्री पासून लागू होईल.) गेल्या वर्षाभरामध्ये गोकुळने उत्पादकांसाठी दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आली. परंतु त्या प्रमाणात दूध विक्री दरामध्ये वाढ करण्यात आली नव्हती त्यामुळे हि दरवाढ करण्यात आली आहे.
यानुसार ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ. गुणप्रतिच्या म्हैस दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ५५.०० रुपयांवरून ५८ रुपये, तर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. गुणप्रतिच्या गाय दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ३७ रुपयांवरून ३९ रुपये करण्यात आला आहे. या दरवाढीमुळे गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे चौदा कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळणार आहे.
यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाल्याने तसेच काही भागात पावसाचे प्रमाण कमी-जास्त असल्याने चाऱ्याच्या उपलब्धतेवर आणि पशुधनाच्या दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे दूध संकलनातही चढ-उतार होत आहेत. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना आर्थिक स्थैर्य मिळावे आणि दुग्ध व्यवसाय सातत्याने सक्षम राहावा, यासाठी ‘गोकुळ’ने दूध खरेदी दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
सध्याची बाजारपेठेतील परिस्थिती, दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, इंधन दरातील वाढ आणि एकूणच महागाईचा सर्वंकष विचार करून दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत संचालक मंडळाने ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध उत्पादकांचे हित आणि त्यांची आर्थिक उन्नती हेच गोकुळचे प्रमुख उद्दिष्ट असून, भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी गोकुळ दूध संघ दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे गोकुळचे चेअरमन राजेश पाटील यांनी पत्रकाद्वारे सांगितले. सुधारित दूध खरेदी दराबाबतचे दरपत्रक लवकरच संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना देण्यात येणार आहे.
गुरुवारी (दि. १९) गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालय येथे संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा दरवाढीचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. याप्रसंगी संघाचे चेअरमन राजेश पाटील, संचालक अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील चुयेकर, विरेंद्र मंडलिक, राहुल पाटील, चेतन नरके, अंबरिषसिंह घाटगे, अजित नरके, किसन चौगले, मदन देसाई, रणजितसिंह दि. पाटील, बाबासाहेब चौगले, रणजितसिंह कृ. पाटील, राहुल देसाई, विद्याधर गुरबे, अजित पाटील, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, बाबासाहेब देवकर, विश्वजीत जाधव, राजूबाबा आवळे, शशिकांत खोत, बयाजी शेळके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. भाग्यश्री डोंगळे, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28 ° C
28 °
28 °
32 %
5.1kmh
16 %
Thu
27 °
Fri
27 °
Sat
27 °
Sun
27 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page