कोल्हापूर :
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथील एमबीए आणि एमबीए – ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटच्या अंतिम वर्षातील एकूण १३ विद्यार्थ्यांची व्ही ट्रान्स प्रा. लि. या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे. पुरवठा साखळी व्यवस्थापन क्षेत्रात या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळाली आहे.
व्ही ट्रान्स ही लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून मालवाहतूक, वितरण, वेअरहाऊसिंग आणि एकात्मिक लॉजिस्टिक्स सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. कंपनीच्या वतीने विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या निवड प्रक्रियेत एमबीए अभ्यासक्रमातील १० आणि एमबीए – ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमातील ३ अशा एकूण १३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एमबीएच्या शुभदा यादव, प्रिती चौगुले, स्वयं पाटील, श्रीधर मोरटी, अवधूत पाटील, हार्दिक घोरपडे, दीक्षा पंके, तेजस्विनी शिंदे, संग्राम कुलकर्णी आणि शर्वरी पाटील यांचा तर एमबीए – ॲग्री बिझनेस मॅनेजमेटच्या हरिओम पेनक, अवंतिका काळे आणि रोहन साळकर यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांना अधिष्ठाता प्रा. डॉ. मुरली भूपती, विभागप्रमुख डॉ. शुभांगी जगताप, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. प्रदीप पाटील, प्रा. स्वराज पाटील, विराज उबाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, प्र कुलपती ऋतुराज पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांनी अभिनंदन केले.
——————————
डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या १३ विद्यार्थ्यांची ‘व्ही ट्रान्स’मध्ये निवड
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28
°
C
28
°
28
°
32 %
5.1kmh
16 %
Thu
27
°
Fri
27
°
Sat
27
°
Sun
27
°
Mon
29
°

