Homeकला - क्रीडाफुटबॉल हंगामाचा किक-ऑफ १ डिसेंबरला

फुटबॉल हंगामाचा किक-ऑफ १ डिसेंबरला

• शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीगने होणार प्रारंभ
कोल्हापूर :
फुटबॉल संघ व खेळाडूंसह तमाम फुटबॉलप्रेमींना नव्या फुटबॉल हंगामाच्या ‘किक-ऑफ’ची आस लागून राहिली होती, ती आता थोड्याच दिवसांत पूर्ण होणार आहे. १ डिसेंबरला सन २०२६-२७च्या फुटबॉल हंगामाचा किक-ऑफ होत आहे. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए)ने शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वरिष्ठ गटातील या स्पर्धेने फुटबॉल हंगामाचा प्रारंभ होईल. छत्रपती शाहू स्टेडियमवर १ डिसेंबरला दुपारी १:३० वाजता उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ विरुद्ध मर्दानी खेळाचा आखाडा तर दुपारी ४ वाजता पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टीस फुटबॉल क्लब या सामन्याने हंगामाचा किक-ऑफ होईल.
केएसए ए डिव्हिजन अंतर्गत संघ व खेळाडू नोंदणी पूर्ण झाल्यावर येथील फुटबॉलशौकिनांना वेध लागतात ते स्थानिक फुटबॉल हंगामाचे. कोल्हापूर व फुटबॉलचं नातं अतूट आहे. येथील पेठापेठांत फुटबॉलचे संघ संस्थान काळापासून आकाराला आले आणि फुटबॉल हा प्रत्येकाच्या नसानसात भिनत गेला. राजाश्रय लाभलेल्या फुटबॉल खेळाला नंतर लोकाश्रय वाढतच गेला आणि येथील फुटबॉल लोकप्रिय झाला. कोल्हापूरकरांनी कुस्तीनंतर सर्वाधिक प्रेम केलं ते फुटबॉल या खेळावर! जिद्द, ईर्षा व चिकाटीने हा खेळ बहरत गेला. हंगामात होणाऱ्या सर्वच फुटबॉल स्पर्धांना फुटबॉलप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळतो.
कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लिग स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केल्याने फुटबॉलप्रेमींना १ डिसेंबरपासून फुटबॉल सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. वरिष्ठ गटातील सोळा संघात साखळी स्पर्धा होईल. मानांकनानुसार स्पर्धेत सिनिअर सुपर-८ आणि सिनिअर-८ अशा दोन गटांतर्गत एकूण सात फेऱ्यांमध्ये ५६ सामने खेळले जातील. सिनिअर सुपर-८ गट व सिनिअर-८ संघ या गटांतर्गत होणाऱ्या सामन्यात यांच्यातील विजयी संघाला तीन गुण, पराभूत संघाला शून्य गुण तर सामना बरोबरीत राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल.
सिनिअर सुपर- ८ आणि सिनिअर- ८ अशा दोन गटांतर्गत होणाऱ्या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार याची चर्चा सुरू झाली आहे. लीग चॅम्पियनचा किताब पटकाविण्यासाठी सिनिअर सुपर-८ गटात चुरस असेल. सर्वाधिक गुण मिळवून कोणता संघ ‘चॅम्पियन’ ठरणार हे आता सुरू होणाऱ्या स्पर्धेत स्पष्ट होईल.
शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेतील सामने छत्रपती शाहू स्टेडियमवर होतील. दररोज दोन सामने खेळले जातील. पहिला सामना दुपारी १:३० वाजता तर दुसरा सामना दुपारी ४ वाजता सुरू होईल. पहिल्या फेरीतील सामने पुढीलप्रमाणे आहेत.
• १ डिसेंबर : उत्तरेश्वर – मर्दानी आखाडा
पाटाकडील – प्रॅक्टीस क्लब
• २ डिसेंबर : बालगोपाल – वर्षाविश्वास
वेताळमाळ – जुना बुधवार
• ३ डिसेंबर : फुलेवाडी – संध्यामठ
शिवाजी – सम्राटनगर
• ४ डिसेंबर : रंकाळा – सुभाषनगर
खंडोबा – दिलबहार
——————————————————-
वरिष्ठ गटातील १६ संघ….
* सिनिअर सुपर- ८ : पाटाकडील तालीम मंडळ, वेताळमाळ तालीम मंडळ, शिवाजी तरुण मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, दिलबहार तालीम मंडळ, सम्राटनगर स्पोर्ट्स, संयुक्त जुना बुधवार पेठ, प्रॅक्टीस फुटबॉल क्लब.
* सिनिअर – ८ : उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ, रंकाळा तालीम मंडळ, सुभाषनगर फुटबॉल क्लब, संध्यामठ तरुण मंडळ, वर्षाविश्वास तरुण मंडळ, मर्दानी खेळाचा आखाडा.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
28 ° C
28 °
28 °
61 %
0kmh
12 %
Tue
28 °
Wed
30 °
Thu
30 °
Fri
29 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page