कोल्हापूर :
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रा. रविंद्र पुरुषोत्तम धोंगडी यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आधार सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित विशेष गौरव सोहळ्यात ‘नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
आधार सोशल फाउंडेशनतर्फे शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी या विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विविध शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रा. रविंद्र पुरुषोत्तम धोंगडी यांना त्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. रविंद्र धोंगडी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले असून, गेल्या २६ वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे २००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक व करिअरविषयक मार्गदर्शन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. तसेच नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या विशेष संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांनाही त्यांनी वेळोवेळी आर्थिक व शैक्षणिक मदतीचा हात दिला आहे.
या पुरस्काराबद्दल घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी प्रा. रविंद्र धोंगडी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. रविंद्र धोंगडी ‘नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड’ने सन्मानित
RELATED ARTICLES
Mumbai
haze
28
°
C
28
°
28
°
61 %
0kmh
12 %
Tue
28
°
Wed
30
°
Thu
30
°
Fri
29
°
Sat
28
°

