Homeशैक्षणिक - उद्योग शनी, चंद्र अन् तारकासमूहांचे विलोभनीय दर्शन

शनी, चंद्र अन् तारकासमूहांचे विलोभनीय दर्शन

• डी. वाय. पाटील महाविद्यालयात आकाश निरीक्षण कार्यक्रम उत्साहात
कोल्हापूर :
विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण व्हावे, तसेच त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, या उद्देशाने कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्टार गेजिंग’ (आकाश निरीक्षण) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ३१ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात या अनोख्या खगोलीय उपक्रमात शनी, चंद्र आणि विविध तारकासमूहांचे दुर्बिणीतून विलोभनीय दर्शन घेत विद्यार्थी आणि पालकांनी अंतराळाची सफर अनुभवली.
महाविद्यालयातील ‘ऑर्बिट स्पेस क्लब’, ‘मॅट्रिक्स क्लब’ आणि ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ डीवायपी सनशाईन’ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे नेटके नियोजन केले. यावेळी १०० हून अधिक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यावे, यासाठी या कार्यक्रमात अत्याधुनिक दुर्बिणीची व्यवस्था करण्यात आली होती. या माध्यमातून सहभागींना शनी ग्रह आणि त्याच्या कड्या, चंद्राचे मनमोहक रूप, रेड जायंट तारा, रोहिणी, आर्द्रा आणि वृषभ राशीतील ‘द बुल’ या खगोलीय चमत्कारांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची दुर्मिळ संधी मिळाली.
‘ऑर्बिट स्पेस क्लब’ विद्यार्थी प्रतिनिधी संस्कृती गावडे, ‘रोटरॅक्ट क्लब’ विद्यार्थी प्रतिनिधी राजसिंह भोसले, तसेच भक्ती कुराडे, इकरा हकीम, कीर्ती घारगे, अथर्व चिमणे, श्रावणी चौधरी, निखिल जाधव आणि हार्दिक गुजर यांनी विशेष परिश्रम घेतले. आकाश निरीक्षणासाठी आवश्यक असणारी तांत्रिक व्यवस्था आणि दुर्बिणीचे नियंत्रण ‘मॅट्रिक्स क्लब’चे संस्थापक विनायक मोरे, सहसंस्थापक जतीन सावंत व त्यांच्या टीमने केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पवार, विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. आर. ए. पाटील, तसेच ऑर्बिट स्पेस क्लबच्या समन्वयक प्रा. प्रांजल फराकटे आणि प्रा. पल्लवी जाधव-घोलप आदी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज एस. पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. एस. पवार, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे,  इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. एम. व्ही. भानुशे आणि सेंट्रल क्लब समन्वयक प्रा. एस. झेड. भाई यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
28 ° C
28 °
28 °
61 %
0kmh
12 %
Tue
28 °
Wed
30 °
Thu
30 °
Fri
29 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page