Homeशैक्षणिक - उद्योग डी वाय पाटील साळोखेनगरचा ‘टेस्ट ग्रँड सोल्युशन्स’शी सामंजस्य करार

डी वाय पाटील साळोखेनगरचा ‘टेस्ट ग्रँड सोल्युशन्स’शी सामंजस्य करार

कोल्हापूर :
येथील डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी ‘टेस्ट ग्रँड सोल्युशन्स प्रा. लि.’ या कंपनीसोबत सामंजस्य करार केला. महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शन विभागाच्या पुढाकाराने झालेल्या या करारामुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजेनुसार तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी निर्माण होणार आहे.
या करारांतर्गत विद्यार्थ्यांसाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण, इंटर्नशिप, औद्योगिक भेटी आणि रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच हॅकथॉन व कोडिंग स्पर्धांसाठी प्रत्यक्ष उद्योगसमस्यांवर आधारित संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील ज्ञानासोबतच उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार असून, आवश्यक व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे.
याप्रसंगी कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने म्हणाले की, शैक्षणिक संस्था आणि उद्योगक्षेत्र यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळण्याबरोबरच त्यांच्या तांत्रिक क्षमतांना योग्य दिशा मिळेल आणि भविष्यातील करिअरसाठी त्यांची तयारी अधिक प्रभावी होईल.
यावेळी कंपनीचे संचालक अनिरुद्ध मांगोरे, प्राचार्य डॉ. सुरेश माने आणि प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील आदी उपस्थित होते. कराराच्या समन्वयाची भूमिका प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शन अधिकारी प्रीती भोसले यांनी पार पाडली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील आणि देवश्री पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
26 ° C
26 °
26 °
65 %
2.1kmh
3 %
Tue
28 °
Wed
29 °
Thu
30 °
Fri
29 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page