कोल्हापूर :
महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सोमवारी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहुजी सभागृहात श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर विकास आराखडा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, या आराखड्यामध्ये भूसंपादन करण्याला प्रथम प्राधान्य असून संबंधित विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे. मंदिराच्या शिखराचे रंग काम करताना त्याचा सर्वोत्तम दर्जा राखला जावा तसेच मंदिरात सुरू असलेली वॉटरप्रूफिंगच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व कामे येत्या पावसाळ्यापूर्वी करून घ्यावीत. त्याचबरोबर विद्युत विभागाने इलेक्ट्रिकची सर्व कामे काळजीपूर्वक करावीत असे निर्देश दिले.
तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे बाधित झालेल्यांना शासन निकषांनुसार भूसंपादनाबाबत योग्य तो मोबदला दिला जाईल असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी तिर्थक्षेत्र विकास आराखडयातंर्गंत मंदिर परिसरात सुरू असलेल्या गरुड मंडप, नगारखाना मनकर्णिका कुंड, विद्युत विभाग, मंदिरातील इतर देवतांच्या मुर्ती संवर्धन तसेच इतर कामांचा विस्तृत आढावा घेतला.
या आढावा बैठकीसाठी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे हे दूरदृष्यप्रणालीद्वारे तर करवीर विभागाच्या प्रभारी उपविभागीय अधिकारी श्रीमती अर्चना नष्टे, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता संजीवनी कट्टी, चंद्रकांत इंगवले, एन. एम. बनसुडे, प्रियांका भोईटे यांच्यासह इतर अधिकारी-पदाधिकारी हे प्रत्यक्ष
जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी घेतला अंबाबाई विकास आराखड्याचा आढावा
Mumbai
haze
26
°
C
26
°
26
°
65 %
2.1kmh
3 %
Tue
28
°
Wed
29
°
Thu
30
°
Fri
29
°
Sat
29
°

