Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचा ‘नगरसेतू’ आंतरराष्ट्रीय 'सेग्यू ३.०' स्पर्धेत अव्वल

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचा ‘नगरसेतू’ आंतरराष्ट्रीय ‘सेग्यू ३.०’ स्पर्धेत अव्वल

• ३ हजार संघांना मागे टाकत ‘द डिस्रप्टर्स’ संघाने पटकावला प्रथम क्रमांक
कोल्हापूर :
ग्रेटर नोएडा येथील एनआयईटी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘सेग्यू ३.० – जागतिक रचना-विचार आव्हान’ या स्पर्धेत तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागातील तेजस चौगुले व प्रतीक तुपे यांच्या ‘द डिस्रप्टर्स’ या संघाने विकसित केलेल्या ‘नगरसेतू’ या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला. या दैदिप्यमान यशाबद्दल संघाला ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देश-विदेशातील ३ हजाराहून  अधिक संघांचा सहभाग होता. अंतिम फेरीत तेजस चौगुले व प्रतीक तुपे यांनी स्वतः विकसित केलेल्या ‘नगरसेतू’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित, भ्रमणध्वनी-केंद्रित नागरी समस्या व्यवस्थापन प्रणालीचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले.
विद्यार्थ्यांची नाविन्यपूर्ण संकल्पना, प्रभावी सादरीकरण आणि नागरी समस्या सोडवण्यातील तंत्रज्ञानाचा अचूक वापर यांमुळे परीक्षकांनी ‘नगरसेतू’ प्रकल्पाला प्रथम क्रमांकाची पसंती दिली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज एस. पाटील, पृथ्वीराज एस. पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आर. एस. पोवार, असिस्टंट रजिस्ट्रार जे. ए. पोवार, संगणक विज्ञान विभागप्रमुख सौ. पी. पी. बावणे, आयक्यूएसी प्रमुख प्रा. के. के. सहस्रबुद्धे यांनी तेजस व प्रतीक यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
         ———–
काय आहे ‘नगरसेतू’? …..
‘नगरसेतू’ हे नागरिक, नगरपालिका प्रशासन आणि क्षेत्रीय कर्मचारी यांना एकाच डिजिटल व्यासपीठावर आणणारे अत्याधुनिक ॲप आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना रस्त्यांवरील खड्डे, कचरा, पाणीपुरवठा किंवा पथदिवे यांसारख्या नागरी समस्या थेट मोबाईलद्वारे फोटोसह नोंदवता येतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने ही तक्रार तत्काळ संबंधित विभागाकडे वर्ग होते आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत त्यावर जलद व पारदर्शक पद्धतीने कार्यवाही केली जाते.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
30.7 ° C
30.7 °
30.7 °
60 %
2.8kmh
0 %
Sat
30 °
Sun
32 °
Mon
31 °
Tue
31 °
Wed
31 °

Most Popular

You cannot copy content of this page