• बालकांनी संकटसमयी ११२ व १०८८ क्रमांकावर संपर्क साधावा
कोल्हापूर :
समाजात वावरताना आपल्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याबद्दल आई-वडील, पालक, शिक्षक किंवा पोलीस दीदीला मोकळेपणाने वस्तुस्थिती सांगा, म्हणजे अनुचित प्रकारांना वेळेत आळा घालून गुन्हा रोखता येतो. अडचणीच्या वेळी, संकटकालीन परिस्थितीत पोलीस विभागाच्या १०९८ किंवा ११२ क्रमांकावर संपर्क साधा. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर टाळा, अशा शब्दांत पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भरोसा सेलच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यभरात गणेशोत्सवाच्या कालावधीत लोकसंवाद हे अभियान राबवण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने “लोकसंवाद” कार्यक्रमांतर्गत छत्रपती शाहू विद्यालयातील विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्थेविषयी मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्याध्यापिका जयंती इंदुलकर, विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक वृषाली पाटील सहायक मुख्याध्यापिका गीता पिल्लई व अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्वाती यादव म्हणाल्या, विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करुन उज्वल भविष्य घडवावे. अभ्यासासाठी हातात घेतलेल्या मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियासाठी केला जातो. परंतु चुकीच्या लिंक उघडल्या गेल्यास त्यातून आर्थिक फसवणूक, मानसिक फसवणूक व अन्य गंभीर गुन्ह्यात अडकले जाण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा. समाजात वावरताना ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीकडून “सिक्रेट गोष्ट सांगू नको” असे सांगून फसवणूक किंवा छळ होऊ शकतो. म्हणूनच कोणतेही सिक्रेट असले तरी ते सर्वप्रथम आपल्या आई-वडिलांना किंवा शिक्षकांना सांगा. गरज भासल्यास तातडीने पोलीसांची मदत घ्या, चांगल्या मित्रांची संगत निवडा, वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय वाहन चालवू नका. पॉक्सो सारख्या बाल गुन्हेगारीच्या घटनांमध्ये कडक शिक्षा होत असल्यामुळे आपल्या हातून कधीही चुकीचे वर्तन घडणार नाही, याची दक्षता घ्या. शाळेत आणि समाजात वावरताना एकमेकांशी मैत्रीपूर्ण नाते जपा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी सुरक्षितता, सोशल मीडियामुळे होणारे गुन्हे, निर्भया पथक, पोलीस हेल्पलाइन, पॉक्सो कायदा २०१२, बालगुन्हेगारी आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
सुरुवातीला विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक (माहिती) वृषाली पाटील यांनी ‘लोकसंवाद’ उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करुन कार्यक्रमाची माहिती दिली.
मुख्याध्यापिका जयंती इंदुलकर यांनी स्वागत तर अश्विनी चौगुले यांनी प्रास्ताविक केले. आभार उपमुख्याध्यापिका गीता पिल्लई यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बालकांनी सोशल मीडियाचा वापर टाळावा : सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यादव
Mumbai
overcast clouds
28.1
°
C
28.1
°
28.1
°
82 %
3kmh
100 %
Tue
28
°
Wed
30
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
28
°

