कोल्हापूर :
ऑस्ट्रेलियातील द युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या भारतातील शाखेने, म्हणजेच यू.डब्ल्यू.ए. (इंडिया) येथील कुलगुरू प्रा. अमित चाकमा यांनी सोमवारी शिवाजी विद्यापीठाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शिवाजी विद्यापीठासोबत शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली. विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन तसेच नव्या ज्ञानक्षेत्रांमध्ये सहकार्याच्या शक्यता यावेळी चर्चेत आल्या.
दि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या विद्यापीठाने अंधेरी (मुंबई) येथे भारतातील पहिला कॅम्पस सुरू केला असून त्या कॅम्पसचे डॉ. चाकमा हे कुलगुरू आहेत. त्यांच्यासह विद्यापीठाच्या अकादमिक व धोरणात्मक सहकार्य व्यवस्थापक डॉ. केलिथा चेरियन यांनीही शिवाजी विद्यापीठास सोमवारी सकाळी भेट दिली. कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.
कुलगुरू डॉ. चाकमा यांनी सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन केले. त्यांनी शिवाजी विद्यापीठातील विविध सुविधा पाहण्यात मोठा रस दाखविला. विद्यापीठातील विविध अधिविभाग, संशोधन सुविधा, क्रीडा सुविधा यांसह विद्यापीठ परिसरातील जैवविविधता, विद्यापीठाने केलेले जलसंवर्धन इत्यादी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. नजीकच्या कालखंडात शिवाजी विद्यापीठासमवेत निश्चितपणाने शैक्षणिक व संशोधकीय बंध निर्माण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.
कुलगुरू डॉ. कामत यांनीही त्यांच्या भेटीविषयी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, या भेटीमुळे विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्ससारख्या भविष्यवेधी क्षेत्रांतील उपक्रम यांसाठी सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होतील. शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी व संशोधकांना जागतिक स्तरावरील शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या भेटीप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे हेही उपस्थित होते.
ऑस्ट्रेलियन विद्यापीठाच्या कुलगुरूंची शिवाजी विद्यापीठास भेट
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29
°
C
29
°
28.9
°
79 %
4.1kmh
92 %
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
28
°

