• थ्री-इन-वन टीव्ही + ओटीटी + वाय-फाय प्लॅनच्या नवीन आणि विद्यमान ग्राहकांना मिळणार लाभ
कोल्हापूर :
जिओहोमच्या ३० एमबीपीएस आणि १०० एमबीपीएस प्लॅनच्या ग्राहकांना आता ॲमेझॉन प्राइम लाइटची एक वर्षाची सदस्यता मोफत मिळणार आहे. जिओहोमच्या थ्री-इन-वन टीव्ही + ओटीटी + वाय-फाय प्लॅनच्या नवीन तसेच विद्यमान ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय हा लाभ मिळेल. जिओच्या १० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाच्या निमित्ताने कंपनीने ही विशेष ऑफर सादर केली आहे.
एक वर्षाच्या ॲमेझॉन प्राइम लाइट सदस्यतेअंतर्गत ग्राहकांना प्राइम व्हिडिओवर विविध चित्रपट आणि शो पाहता येणार आहेत. याशिवाय ॲमेझॉनवरील पात्र ऑर्डर्ससाठी मोफत आणि जलद डिलिव्हरीची सुविधाही मिळणार आहे.
ही ऑफर १९ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू होईल आणि पुढील दोन आठवड्यांत या प्लॅनच्या सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचेल. मायजिओ ॲपच्या होमपेजवर ॲमेझॉन प्राइम लाइट ऑफरचा बॅनर दिसेल. ग्राहकांनी या बॅनरवर टॅप केल्यानंतर एक वर्षाची मोफत सदस्यता सक्रिय करता येईल. सदस्यतेचे १२ महिने मोजण्यास ती सक्रिय केल्याच्या दिवसापासून सुरुवात होईल.
दरम्यान, ₹८८८, ₹१,१९९ आणि १५० एमबीपीएस किंवा त्याहून अधिक स्पीडच्या प्लॅनच्या ग्राहकांना यापूर्वीपासून मिळत असलेला २४ महिन्यांचा ॲमेझॉन प्राइम लाइट लाभ यापुढेही सुरू राहणार आहे. या लाभामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
——————————
जिओहोमच्या ३० आणि १०० एमबीपीएस प्लॅनवर एक वर्ष ॲमेझॉन प्राइम लाइट मोफत
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
31
°
C
31
°
29.9
°
70 %
2.6kmh
13 %
Mon
31
°
Tue
29
°
Wed
28
°
Thu
29
°
Fri
28
°

