Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’ विद्यापीठस्तरीय फेरी उत्साहात

डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’ विद्यापीठस्तरीय फेरी उत्साहात

• नाविन्यपूर्ण तांत्रिक व सामाजिक समस्यांवर विद्यार्थ्यांचे सादरीकरण
कोल्हापूर :
डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, तळसंदे येथे ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२६’ अंतर्गत विद्यापीठ स्तरीय फेरी संपन्न झाली. या स्पर्धेत विविध शाखांतील विद्यार्थ्यांच्या ४१ संघातील २४६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये ‘स्मार्ट वेअरहाऊसमध्ये एज-एआयद्वारे स्वायत्त रोबोटचे समन्वित नियंत्रण’ या समस्येवरील प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डिजिटल तंत्रज्ञान, रोबोटिक्स, सायबर सिक्युरिटी, स्मार्ट ऑटोमेशन तसेच इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध तांत्रिक, सामाजिक आणि प्रत्यक्ष जीवनाशी संबंधित समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय सादर केले. या प्रकल्पांचे परीक्षण अंजोरी कुंभोजे, वैभव आर्डे, प्रा. मन्नान फरास आणि प्रा. (डॉ.) विनायक पारळे या तज्ज्ञ ज्युरी सदस्यांनी केले.
सादर करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये मुल्ला सुहेल रफीक यांच्या नेतृत्वाखालील संघाने ‘स्मार्ट वेअरहाऊसमध्ये एज एआय द्वारे स्वायत्त रोबोटचे समन्वित नियंत्रण’ या समस्येवरील प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला. सुजल एस. बुजारे यांच्या ‘पिकांतील रोग व कीड यांचे लवकर निदान व प्रभावी व्यवस्थापन’ या प्रकल्पाने द्वितीय  तर साद अत्तार यांच्या उपग्रह प्रतिमा आणि एआयएस डेटा वापरून समुद्रातील तेलगळती ओळखणे व त्यासाठी जबाबदार जहाजाचा शोध घेणे या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला.
या हॅकॅथॉनच्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील समस्यांकडे तांत्रिक दृष्टिकोनातून पाहण्याची तसेच त्यावर व्यवहार्य आणि नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्याची संधी मिळाली. यावेळी प्रा. डॉ. संग्राम टी. पाटील, प्रा. डॉ. वाय. एम. पाटील आणि  सुजित सरनाईक  यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची माहिती घेतली व त्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन इंटर्नशिप अँड इंटर्नप्रेनरशिप सेल आणि रिसर्च डेव्हलपमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२६ चे समन्वयक प्रा. विशाल एच. पुंदिकर आणि डॉ. नमिता एस. पाटील यांनी समन्वय केले. डॉ. एन. ए. पाटील आणि रणवीर कदम यांचे सहकार्य लाभले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, प्र-कुलपती ऋतुराज पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू प्रा. (डॉ.) अनिलकुमार एस. गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र ए. खोत यांनी सहभागी विद्यार्थी, मार्गदर्शक, ज्यूरी सदस्य यांचे अभिनंदन करून पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
29 ° C
29 °
29 °
74 %
3.1kmh
18 %
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page