• ६३ लाखांचे वैदयकीय साहित्य प्रदान
कोल्हापूर :
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजतर्फे कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटला ‘प्रोजेक्ट नेफ्रोकेअर’ अंतर्गत सुमारे ६३ लाख रुपये किंमतीची अत्याधुनिक वैद्यकीय नेफ्रोकेअर उपकरणे हस्तांतरित करण्यात आली. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थितीत रोटरी इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन डॉ. लेनी डिकोस्टा यांच्या हस्ते ही उपकरणे हस्तांतरित करण्यात आली.
रोटरी फाउंडेशन ग्लोबल ग्रँट अंतर्गत देण्यात आलेल्या या उपकरणांमध्ये सीआरआरटी मशीन, मल्टीपॅरा मॉनिटर, सिरिंज पंप, इन्फ्युजन पंप आणि डायलिसिस बेड यांचा समावेश आहे. गंभीर अवस्थेतील मूत्रपिंड विकारांच्या गरजू रुग्णांवर उपचार करताना या उपकरणांचा मोठा फायदा होणार असून, नेफ्रोलॉजी विभागातील रुग्णसेवा अधिक सक्षम होणार आहे.
यावेळी बोलताना डॉ. लेनी दा कोस्टा म्हणाले, ग्रामीण भागात आरोग्यसेवा प्रभावीपणे पोहचवण्याचे काम डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून होत आहे. नेफ्रोकेअर उपकरणामुळे मूत्रपिंड विकाराशी सबंधित रुग्णांना उत्तम उपचार मिळण्याबरोबरच वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षणालाही मोठी मदत होईल. ग्रामीण भागात डायलिसिस अन्य उपचार सुविधांची कमतरता असून केवळ अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून न थांबता, त्यांचा प्रभावी वापर करणारे कुशल तंत्रज्ञ घडविण्यावरही भर दिला पाहिजे.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे अध्यक्ष योगेश रास्ते म्हणाले की, समाजसेवेच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे हे रोटरीचे ध्येय आहे. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे कार्य अतिशय कौतुकास्पद असून त्यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळावेत हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. रोटरी आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या एकत्रित प्रयत्नांतून भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल.
हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागप्रमुख डॉ. सुषमा जोतकर म्हणाल्या, रोटरीच्या सहकार्यातून उपलब्ध झालेल्या या अत्याधुनिक उपकरणांमुळे गंभीर रुग्णाना दिलासा मिळेल. एकाच वेळी अनेक अवयवांच्या विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ही उपकरणे विशेष उपयुक्त ठरणार आहेत.
रोटरीयन राहुल कुलकर्णी व अरुण भंडारे यांनीही मनोगत व्यक्त केले. कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांनी रोटरीच्या या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. आर. जे. ख्यालप्पा, उप-अधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, विजय कुलकर्णी, चेतन एस. भोकरे यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार डॉ. अभिजित कोराणे यांनी मानले.
——————————
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला ‘रोटरी’कडून अत्याधुनिक नेफ्रोकेअर उपकरणे
Mumbai
overcast clouds
28
°
C
28
°
28
°
83 %
1.5kmh
97 %
Sat
28
°
Sun
27
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°

