Homeइतरश्री दत्त साखर कारखान्याला 'सर्वोत्तम ऊस विकास'चा प्रथम पुरस्कार जाहीर

श्री दत्त साखर कारखान्याला ‘सर्वोत्तम ऊस विकास’चा प्रथम पुरस्कार जाहीर

कोल्हापूर :
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लिमिटेडच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला २०२४-२५ या हंगामासाठी ‘उच्च साखर उतारा असलेल्या क्षेत्रातील ‘सर्वोत्तम ऊस विकास’ या श्रेणीतील प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार मंगळवारी (दि. २२) सकाळी ११:३० वाजता डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, १५, जनपथ, विंडसर प्लेस, नवी दिल्ली येथे आयोजित वार्षिक समारंभात केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्री यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि.चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी पत्राद्वारे दिली आहे.
२०२४-२५ चा हंगाम आव्हानात्मक असतानाही शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. कारखान्याने सादर केलेल्या माहितीच्या आधारे, भारत सरकारच्या मुख्य संचालकांच्या (साखर) अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या ‘पुरस्कार निवड समिती’ने कार्यक्षमता पुरस्कार २०२४-२५ चे निकाल निश्चित केले आहेत.
श्री दत्त कारखान्याच्या स्वतंत्र ऊस विकास विभागाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जमिनीच्या पूर्व मशागती पासून ते ऊस पीक गाळपापर्यंतचे मार्गदर्शन देण्यात येते. यामध्ये सेंद्रिय कर्ब ०.२३ टक्के पासून सरासरी ०.८७ टक्के पर्यंत वाढविण्यासाठी सलग १० वर्षे प्रयत्न, कारखाना कार्यक्षेत्रामध्ये २७ टक्के बियाणे बदल, सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान, मोफत माती, पाने, पाणी परीक्षण व मोफत सल्ला, पाचट व्यवस्थापन, सभासदांना रासायनिक, जैविक व सेंद्रिय खतांचा पुरवठा, सेंद्रिय ऊस उत्पादन करून सेंद्रिय साखर निर्मिती, नाविन्यपूर्ण क्षारपड चोपण जमीन सुधारण्याकरिता सच्छिद्र निचरा प्रणालीचा १० हजार एकरावरती वापर करून ऊस उत्पादन वाढविण्यामध्ये कारखान्याने हातभार लावला आहे. कारखान्याच्या वतीने या विविध ऊस विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28 ° C
28 °
28 °
83 %
1.5kmh
97 %
Sat
28 °
Sun
27 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page