Homeशैक्षणिक - उद्योग कुशल कृषी अभियंत्याना मोठी संधी : डॉ. एस. बी. पाटील

कुशल कृषी अभियंत्याना मोठी संधी : डॉ. एस. बी. पाटील

• डी. वाय. पाटील बी.टेक. ॲग्रीमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत
कोल्हापूर :
कृषी क्षेत्रामध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढत असून कृषी अभियंत्यांना भविष्यात मोठी संधी असल्याचे प्रतिपादन डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदेचे प्राचार्य तथा कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील यांनी केले. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत व दीक्षारंभ समारंभ ते बोलत होते.
डॉ. एस. बी. पाटील  म्हणाले की, शेतीसमोरील बदलती आव्हाने, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि अन्नसुरक्षेची गरज लक्षात घेता कृषी क्षेत्राला कुशल अभियंत्यांची मोठी आवश्यकता आहे. कृषी अभियांत्रिकीची निवड करून विद्यार्थ्यांनी उज्ज्वल करिअरच्या दिशेने योग्य निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी कौशल्य, संशोधन आणि नवोपक्रमाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी पुढे यावे.
डॉ. वाय. व्ही. शेटे यांनी प्रास्ताविक करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. उपप्राचार्य प्रा. पी. डी. उके यांनी महाविद्यालयाची कार्यप्रणाली, परीक्षा पद्धती तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग, देहराडून येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल प्रणव पाटील, दीपक शिंदे आणि श्रावणी माने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालक यांच्यावतीने विद्यार्थी प्रतिनिधी आणि पालक प्रतिनिधी म्हणून अनुक्रमे वेदिका जाधव आणि एस. ए. गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
प्रा. संदीप पाटील यांनी डॉ. एस. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या ‘स्मरणिका-२०२६’चे प्रकाशन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन प्रा. एस. एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, फार्म हेड इंजि. ए. बी. गाताडे, ॲडमिशन इन्चार्ज डॉ. पी. एस. बंडगर यांनी  नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
30 ° C
30 °
29.9 °
70 %
6.2kmh
76 %
Sat
29 °
Sun
27 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page