• अपोलो हॉस्पिटलमधील तज्ज्ञांच्या उपचारांना यश
कोल्हापूर :
तीव्र यकृत निकामी होण्याच्या गंभीर स्थितीत नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणासाठी दाखल झालेल्या कोल्हापुरातील पद्मजा नांद्रे यांच्या प्रकृतीत उपचारांदरम्यान लक्षणीय सुधारणा झाली. त्यामुळे प्रत्यारोपणाची पूर्ण तयारी झाल्यानंतरही डॉक्टरांनी शस्त्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती अंतरंग हॉस्पिटलचे डॉ. विवेकानंद कुलकर्णी व डॉ. आदित्य कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. अमेय सोनवणे, डॉ. गुरुप्रसाद शेट्टी, डॉ. सुवदीप सेन उपस्थित होते.
पद्मजा यांना सुरुवातीला कोल्हापुरातील अंतरंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बिलिरुबिनची पातळी वाढत असल्याने त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये संदर्भित करण्यात आले. तेथे यकृत प्रत्यारोपण व अतिदक्षता विभागातील तज्ज्ञांनी त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले. संभाव्य प्रत्यारोपणासाठी त्यांच्या मुलीची जिवंत यकृतदाता म्हणून तपासणीही करण्यात आली.
अपोलो हॉस्पिटलमधील ट्रान्सप्लांटेशन सर्जरी हेड डॉ. गुरुप्रसाद शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू असताना पद्मजा यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. त्यांना विशेष यकृत उपचार, अतिदक्षता सेवा आणि प्लाझ्मा एक्सचेंजची अनेक सत्रे देण्यात आली. त्यानंतर यकृताची कार्यक्षमता सुधारत असल्याचे लक्षात आल्याने प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया रद्द करण्यात आली.
क्रिटिकल केअर तज्ज्ञ डॉ. सुवदीप सेन आणि हेपॅटोलॉजी तज्ज्ञ डॉ. अमेय सोनवणे यांनी उपचारादरम्यान सातत्याने वैद्यकीय निरीक्षण व मूल्यांकनाचे महत्त्व अधोरेखित केले. उपचारानंतर पद्मजा यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्या सुखरूप कोल्हापूरला परतल्या.
या प्रकरणातून गंभीर यकृत निकामी होण्याच्या स्थितीत रुग्णाला वेळेत तज्ज्ञ व प्रत्यारोपण सुविधा असलेल्या केंद्रात हलविण्याचे महत्त्व स्पष्ट झाले आहे.
——————————
यकृत प्रत्यारोपण टळले; अत्याधुनिक उपचारांनी प्रकृतीत सुधारणा
Mumbai
broken clouds
30
°
C
30.9
°
30
°
70 %
3.1kmh
82 %
Fri
29
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

