Homeकला - क्रीडाक्रिकेटपटूंसाठी मंगळवारी मोफत आहार मार्गदर्शन कार्यशाळा

क्रिकेटपटूंसाठी मंगळवारी मोफत आहार मार्गदर्शन कार्यशाळा

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए)च्या वतीने जिल्ह्यातील १२, १४, १६, १९ वर्षांखालील तसेच सिनियर क्रिकेटपटू (मुले व मुली), प्रशिक्षक, ट्रेनर्स, फिजिओ आणि विशेषतः पालकांसाठी मोफत आहार मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता धैर्यप्रसाद हॉल, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे होणार आहे. आहारतज्ज्ञ डॉ. नीलम जिरगे या खेळाडूंना आहाराचे महत्त्व, योग्य आहार नियोजन आणि क्रीडा क्षेत्रातील आहाराबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व क्रिकेटपटू, प्रशिक्षक, ट्रेनर्स आणि पालकांसाठी ही कार्यशाळा विनामूल्य आहे. त्यामुळे सर्वांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यशाळेस येताना व्हाईट कीट, स्पोर्ट्स शूज आणि पाण्याची बाटली सोबत आणावी, असे केडीसीएचे सचिव मदन शेळके यांनी कळविले आहे.
अधिक माहितीसाठी जनार्दन यादव (मो.नं. ९८२२१३७७७७), मुद्दसर मुल्ला (मो.नं. ७७४४९६६३६६), सुबोध देसाई (मो.नं. ९८९०८६८०९४) यांच्याशी संपर्क साधावा.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
31 ° C
31 °
30.9 °
70 %
4.6kmh
78 %
Mon
31 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page