Homeकला - क्रीडाघोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर-९ बास्केटबॉल स्पर्धेचा शुभारंभ

घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर-९ बास्केटबॉल स्पर्धेचा शुभारंभ

कोल्हापूर :
सीबीएसई बोर्ड नवी दिल्ली मार्फत आयोजित सीबीएसई क्लस्टर-९ बास्केटबॉल चॅम्पियनशिप २०२६-२७ स्पर्धेचा संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूरच्या  मैदानावर उत्साहात शुभारंभ झाला. स्पर्धा २१ ते २५ ऑगस्ट २०२६ दरम्यान खेळल्या जाणार आहेत. महाराष्ट्र व गोवा राज्यांतील ४४ शाळांमधील १००० हून अधिक विद्यार्थी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. १४, १७ व १९ या वयोगटातील मुले व मुली या पद्धतीने स्पर्धा पार पडतील.
स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यास आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू सक्लैन सय्यद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, सीबीएसई निरीक्षक पूर्ण श्रेष्ठ, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिक-प्राचार्या सस्मिता मोहंती आणि शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. महिंद्र चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोहळ्यात सहभागी संघांच्या दिमाखदार संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर खेळाडूंचा शपथविधी आणि संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरणात उत्साह व चैतन्य निर्माण केले. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाल्यानंतर पुढील पाच दिवसांच्या रोमांचक सामन्यांना सुरुवात झाली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन, डे बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य अस्कर अली, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे, क्रीडा संचालक विठ्ठल केंचन्नावर, सर्व क्रीडा शिक्षक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी हे योगदान देत आहेत.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28 ° C
28 °
28 °
83 %
4.6kmh
97 %
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page