Homeशैक्षणिक - उद्योग डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाला गुणवंत विद्यार्थ्यांची पसंती

डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाला गुणवंत विद्यार्थ्यांची पसंती

कोल्हापूर :
तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेश प्रक्रियेत गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी पसंती दिली आहे. कृषी अभ्यासक्रमासाठी एमएचटी-सीईटी परीक्षेत उच्च गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतल्याने संस्थेच्या उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहेत.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि सीईटी सेल, मुंबई यांच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेशाची पहिली फेरी जाहीर करण्यात आली. या फेरीत एमएचटी-सीईटी परीक्षेत ९६.४१ पर्सेंटाईल गुण प्राप्त करणारी सानिका संजय मोरे आणि ९६.१९ पर्सेंटाईल गुण प्राप्त करणाऱ्या अनुष्का विकास कदम यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्राचार्य प्रा.डी.एन. शेलार यांनी यावेळी संस्थेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी ॲकॅडमिक इनचार्ज प्रा. आर. आर. पाटील, रजिस्ट्रार आर. पी. शिंदे, ॲडमिशन प्रमुख डॉ. व्ही. आर. पाटील, सर्व विभागप्रमुख तसेच प्राध्यापक उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज संजय पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता व कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील, यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
6.2kmh
100 %
Fri
28 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page