कोल्हापूर :
तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी पदविका विद्यालयाच्या ८ विद्यार्थ्यांची झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या कॅम्पस ड्राइव्हद्वारे हि निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान, संवाद कौशल्य, विषयाचे आकलन, आत्मविश्वास तसेच उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांचे मूल्यमापन करण्यात आले.
झायडेक्स इंडस्ट्रीज प्रा. लि. ही कृषी क्षेत्राशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादन व नाविन्यपूर्ण उपाय योजनांसाठी कार्यरत असलेली नामांकित कंपनी आहे. कृषी पदविका विद्यार्थ्यांसाठी अशा उद्योग समूहात रोजगाराची संधी मिळणे ही विद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे.
विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमाचे ज्ञान न देता तांत्रिक कौशल्ये, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, मुलाखत तंत्र, उद्योग भेटी, प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि रोजगाराभिमुख मार्गदर्शन यावर विशेष भर दिला जातो. याच सातत्यपूर्ण प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्ये चांगला फायदा झाल्याचे प्राचार्य प्रा. पी. एस. पाटील यांनी सांगितले.
ट्रेनिंग ॲड प्लेसमेंट अधिकारी प्रा. एस. एस. कदम व सहकाऱ्यांनी या निवड प्रक्रियेसाठी विशेष परिश्रम घेतले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, प्राचार्य प्रा. पी. एस. पाटील, सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
——————————
डॉ. डी. वाय. पाटील कृषी पदविका विद्यालयाच्या ८ विद्यार्थ्यांची निवड
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29
°
C
29
°
28.9
°
79 %
6.2kmh
56 %
Thu
29
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°

