Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या डेटा सायन्स विभागाला आघाडीच्या कंपन्यांची पसंती

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या डेटा सायन्स विभागाला आघाडीच्या कंपन्यांची पसंती

• ८९ प्लेसमेंट जॉब ऑफर्स
• एचपीमध्ये ८.५ लाखांचे सर्वोच्च पॅकेज
कोल्हापूर :
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कसबा बावडा  अधिकारी प्रदत्त स्वायत्त विभागातील विद्यार्थ्यांना ३२ हून अधिक नामांकित कंपन्यांकडून ८९ प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त झाल्या असून, एचपी (हेवलेट-पॅकार्ड) मध्ये ८.५ लाख रुपये सर्वोच्च पॅकेज मिळाले आहे.
यावर्षी एचपी (हेवलेट-पॅकार्ड), इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्रा, कॉन्सेन्ट्रिक्स, फोक्सवॅगन इंडिया, ग्लोलॉजिक्स सोल्युशन्स, टेस्टयंत्रा सॉफ्टवेअर सोल्युशन्स, ऍपमोसिस  टेक्नॉलॉजीज, वॉलस्टार टेक्नॉलॉजीज यांसह अनेक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विभागातील विद्यार्थ्यांची निवड केली.
लॉन्चड ग्लोबल या कंपनीने विभागातील २५ विद्यार्थ्यांची निवड करून सर्वाधिक भरती करणारी कंपनी ठरली. त्याखालोखाल अनलॉक्सने १४ विद्यार्थ्यांची, तर वॉलस्टार टेक्नॉलॉजीजने ८ विद्यार्थ्यांची आणि ग्लो लॉजिक्स प्रा.लि. ने ४ विद्यार्थ्यांची निवड केली. याशिवाय एज्यु व्हर्सिटी, टेस्ट यंत्रा, टेक महिंद्रा, टी.सी.एस, इन्फोसिस आदी अनेक कंपन्यांनीही विद्यार्थ्यांना आकर्षक पॅकेजवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, विभागप्रमुख डॉ. गणेश व्ही. पाटील, प्लेसमेंट समन्वयक तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे यासाठी योगदान लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सी.एच.आर. ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
79 %
4.6kmh
100 %
Wed
29 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page