कोल्हापूर :
विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील रोजगाराच्या संधींसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सॉफ्ट स्किल, ॲप्टिट्यूड आणि टेक्निकल ट्रेनिंग उपक्रमाचा प्रारंभ. अभियांत्रिकी, एम.एस्सी., एमबीए, बीबीए, एमसीए आणि बीसीए आदी शाखांमधील २,३०० विद्यार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेणार आहेत.
कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांच्या उपस्थितीत या प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांना केवळ पदवीधर नव्हे, तर उद्योगसज्ज, आत्मविश्वासपूर्ण आणि रोजगारक्षम व्यावसायिक घडविणे हेच आमचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच त्यांची उद्योगक्षेत्रातील रोजगारक्षमता वाढविण्यासाठी या उपक्रमाचा अतिशय चांगला फायदा होईल असा विश्वास डॉ. एस. के. गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रशिक्षणामध्ये संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, गटचर्चा, मुलाखत कौशल्य, तार्किक विचारक्षमता, संख्यात्मक क्षमता, समस्या सोडविण्याची कौशल्ये तसेच उद्योगांच्या गरजेनुसार आवश्यक असलेले तांत्रिक विषय यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रशिक्षणासाठी विद्यापीठाने विविध क्षेत्रातील बाह्य तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती केली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यापूर्वी गेल्या महिन्यात बी.टेक. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, डेटा सायन्स आणि एमसीए विभागातील विद्यार्थ्यांसाठी १२ दिवसांचे विशेष प्रशिक्षण आयोजित केले होते. प्रा. प्रदीप पाटील, प्रा. विशाल पुंदिकर यांनी या प्रशिक्षणासाठी विशेष योगदान दिले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष सतेज पाटील, प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
——————————
डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदेच्या २३०० विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29
°
C
29
°
29
°
79 %
4.6kmh
100 %
Wed
29
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°

