• राज्य गुणवत्ता यादीत २२, तर जिल्हा गुणवत्ता यादीत १०५ विद्यार्थी
कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळांनी पुन्हा एकदा गुणवत्तेचा झेंडा फडकावत प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मनपा शाळांमधील तब्बल २२ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत, तर १०५ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, तसेच स्पर्धात्मक परीक्षांसाठी त्यांचा पाया भक्कम व्हावा, यासाठी प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने पहिलीपासूनच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. इयत्ता पहिली व दुसरीसाठी ‘कोल्हापूर टॅलेंट सर्च’, तिसरी व सहावीसाठी ‘प्रज्ञाशोध परीक्षा’, तर चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्कॉलरशिप सराव परीक्षा’ नियमितपणे घेतल्या जातात.
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मनपा प्रशासनाकडून दोन सराव परीक्षा आणि एक अंतिम सराव परीक्षा घेतली जाते. विशेष म्हणजे, या परीक्षांचे निकाल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अचूकपणे तयार करून अवघ्या एका तासात पालकांच्या मोबाईलवर पाठविले जातात. या नियोजनबद्ध सरावामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून, त्याचा सकारात्मक परिणाम अंतिम परीक्षेच्या निकालात दिसून आला आहे.
मनपा शाळांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाचे श्रेय महापौर सौ. रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, उपायुक्त किरणकुमार धनवाडे आणि प्रशासनाधिकारी सौ. जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाला दिले जात आहे.
या उपक्रमासाठी प्राथमिक शिक्षण समितीचे कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, परीक्षा विभागातील संजय शिंदे तसेच सर्व अधिकारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.
————–
शिष्यवृत्तीसोबत ‘इस्रो’ अभ्यासदौऱ्याची संधी…
शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीइतकीच शिष्यवृत्ती कोल्हापूर महानगरपालिकेकडूनही दिली जाते. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणारी कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील एकमेव महानगरपालिका असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. याशिवाय, इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अभ्यासदौऱ्यावर पाठविले जाते. या संपूर्ण अभ्यासदौऱ्याचा खर्च महानगरपालिकेकडून केला जातो.
—————————— ————————-

——————————