• सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सन्मान
कोल्हापूर :
कृषी व तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट शैक्षणिक कार्य, संशोधन, नवोपक्रम आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला ‘बेस्ट युनिव्हर्सिटी इन ॲग्रीकल्चर अँड टेक्निकल इनोव्हेशन’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबई येथे झालेल्या ‘एज्युकेशन समिट’मध्ये राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. जे. ए. खोत व वित्त अधिकारी सुजीत सरनाईक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
तळसदे सारख्या ग्रामीण भागात २०२१ मध्ये डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाची स्थापना केली. गेल्या पाच वर्षात उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर विद्यापीठाने नावलौकिक मिळवला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यापीठाने कृषी, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधनाला प्राधान्य दिले. अत्याधुनिक प्रयोगशाळा, उद्योग व संशोधन संस्थांशी सहकार्य, आधुनिक शैक्षणिक पद्धती, कौशल्य विकास आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम आणि उद्योजक बनविण्यावर विद्यापीठाचा सातत्याने भर राहिला आहे.
कृषी व तांत्रिक शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उद्योगाभिमुख शिक्षण, संशोधनाला चालना, कौशल्याधारित अभ्यासक्रम, स्टार्टअप आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन तसेच विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनविण्यासाठी विद्यापीठाकडून सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात. शिक्षण, संशोधन आणि नवसंशोधन यांचा प्रभावी संगम घडवून विद्यार्थ्यांना भविष्याभिमुख बनविण्याच्या विद्यापीठाच्या कार्याची विशेष दखल घेत ‘बेस्ट युनिव्हर्सिटी इन ॲग्रीकल्चर अँड टेक्निकल इनोव्हेशन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी या पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन केले. हा पुरस्कार म्हणजे विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पोचपावती असून सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांच्या सामूहिक प्रयत्नांचा हा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.
प्र- कुलपती ऋतुराज पाटील म्हणाले, कृषी व तांत्रिक शिक्षण क्षेत्रात संशोधन, नवोपक्रम आणि समाजाभिमुख शिक्षणाच्या माध्यमातून नवे मापदंड निर्माण करण्याच्या विद्यापीठाच्या वचनबद्धतेचा हा गौरव आहे.
कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, या पुरस्कारामुळे नवी ऊर्जा मिळाली आहे. भविष्यातही जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून सक्षम विद्यार्थी व सुजाण नागरिक घडविण्याचे कार्य अधिक जोमाने करू.
——————————
डी. वाय. पाटील व तंत्र विद्यापीठाला ‘बेस्ट युनिव्हर्सिटी’ पुरस्कार
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1
°
C
28.1
°
28.1
°
84 %
10kmh
99 %
Sun
29
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
28
°

